आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि तेलगू देसम पार्टीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांच्या कार्यक्रमात पुन्हा चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेत तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. चार दिवसांपूर्वीही नायडू यांच्या एका ‘रोड शो’दरम्यान अशीच घटना घडली होती. या चेंगराचेंगरीनंतर अवघ्या चारच दिवसात घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यात बुधवारी (२८ डिसेंबर) नायडू यांच्या ‘रोड शो’दरम्यान एका महिलेसह आठ जणांचा चेंगरून मृत्यू झाला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्यानंतर आज रविवारी (१ जानेवारी) गुंटूर येथे चंद्राबाबू नायडू यांच्या जाहीरसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये सर्व महिला आहेत. या चेंगराचेंगरीनंतर जखमी झालेल्या नागरिकांना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

‘एएनआय’ने दिलेल्या वृत्तानुसार, आंध्र प्रदेशातील गुंटूर येथे चंद्राबाबू नायडू यांच्या जाहीरसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाच्या ठिकाणी नायडू यांनी आगामी संक्रांत सणांच्या पार्श्वभूमीवर भेटवस्तू देण्याचं नियोजन केलं होतं. भेटवस्तुंचे वाटप सुरू असताना चेंगराचेंगरी घडून तीन महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stampede at former cm n chandrababu naidu public meeting in guntur telugu desam party andhra pradesh 3 dies rmm