लडाख येथील चुमार प्रांतातून दोन दिवसांपूर्वी सैनिक माघारी घेतल्यानंतर शनिवारी पुन्हा चिनी लष्कराच्या एका तुकडीने याच प्रांतात घुसखोरी केल्याने येथील परिस्थिती अधिकच चिघळली आहे.
चुमार प्रांतातील ‘पॉइंट ३०-आर’ क्षेत्रात ९ वाहनांतून पीपल्स लिबरेशन आर्मीचे सुमारे ५० जवान उतरले. ३५ जवान आधीपासूनच चुमारच्या उंच भागांत तळ ठोकून आहेत, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. लडाखपासून ३०० किलोमीटर अंतरावर चुमार प्रांत आहे. या सैनिकांनी वाहनातून तत्काळ उतरून भारतीय लष्करापासून सुमारे १०० मीटर अंतरावर आपापली जागा घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.
गुरुवारी रात्री चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या काही जवानांनी भारतीय क्षेत्रातून माघार घेतली असली तरी भारतीय लष्कराने तेथून पूर्णपणे मागे न हटण्याचा निर्णय घेतला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Standoff worsens as chinese troops enter chumar again