युनायटेड किंग्डमच्या (यूके)ने आज(रविवार)पासून आपल्या ‘रेड’ मधून ‘एम्बर’ यादीत स्थानांतरित करून भारतासाठी प्रवास निर्बंध शिथिल केले आहेत. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की, पूर्णपणे लसीकरण झालेल्या भारतीय प्रवाशांना आता ब्रिटनमध्ये आल्यानंतर अनिवार्य करण्यात आलेल्या दहा दिवसीय हॉटेल क्वारंटाईनची सक्ती केली जाणार नाही.

आरोग्य आणि सामाजिक देखरेख विभाग (डीएसएससी)ने याबाबत दुजोरा दिला आहे की, भारतातून येणाऱ्या आलेल्या सर्वांना ज्यांचे भारतात लसीकरण झालेले आहे. जे रविवारी स्थानिक वेळेनुसार पहाटे ४ एम्बर यादीत आहेत, त्यांना घरी किंवा त्यांच्या नियुक्त केलेल्या ठिकाणी लोकेटर फॉर्मवर वेगळं करणं आवश्यक आहे.

१ हजार ७५० पाउंडच्या प्रति व्यक्तीच्या अतिरिक्त खर्चावर सरकार मान्यताप्राप्त सुविधेमध्ये १० दिवसांच्या सेल्फ-आयसोलेशनची अनिवार्य आवश्यकता यापुढे लागू असणार नाही, तर केवळ यूके किंवा युरोपमधील लसीकरण केलेले प्रवासी होम क्वारंटाइनच्या आवश्यकतेच्या शिथिलतेसाठी पात्र ठरतील.

शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अदर पूनावाला यांची मोठी घोषणा; आर्थिक मदतीसाठी घेतला पुढाकार!

दरम्यान, करोना काळामध्ये देखील अनेक देशांमध्ये निर्बंध अजूनही कायम आहेत. पण काही देशांनी परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी निर्बंध उठवले आहेत. अशा देशांमध्ये शिकण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी आता संबंधित देशात जाण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र, काही विद्यार्थ्यांना परदेशात गेल्यावर क्वारंटाईन केलं जात आहे. सिरम इन्स्टिट्युटतर्फे उत्पादित केली जाणारी कोविशिल्ड लस घेऊनही काही विद्यार्थ्यांना संबंधित देशामध्ये क्वारंटाईन व्हावं लागत आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी सिरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पूनावाला यांनी मदतीचा हात पुढे केला असून तब्बल १० कोटींची रक्कम या विद्यार्थ्यांसाठी बाजूला ठेवल्याचं अदर पूनावाला यांनी जाहीर केलं आहे.