Yogi Adityanath on Mandir-Masjid Debate : देशात अनेक मंदिर-मशीदीचे वद निर्माण झाले आहेत. या वादावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, वारसा पुन्हा मिळवणे ही वाईट गोष्ट नाही. महाकुंभमेळ्यापूर्वी ते आजतकच्या धर्म संसद कार्यक्रमात बोलत होते. त्यांनी वक्फ मालमत्तासंदर्भातही टिप्पणी केली.

“वारसा परत मिळवणे ही वाईट गोष्ट नाही. सनातनचे पुरावे आता संभलमध्ये दिसत आहेत. वादग्रस्त वास्तूंना मशीद म्हणू नये. मुस्लिम लीगच्या मानसिकतेवर भारत चालवला जाणार नाही”, असे आदित्यनाथ यांनी शाही जामा मशीद वादाचा संदर्भ देत म्हटले.

हेही वाचा >> Bomb Threat : दिल्लीतील शाळांना बॉम्बची धमकी प्रकरणात मोठी माहिती समोर; १२ वीच्या विद्यार्थ्याला अटक, कारण ऐकून सर्वांनाच बसला धक्का

त्या जमिनी हक्काच्या मालकांना परत करणार

प्रयागराजमधील महाकुंभ वक्फ जमिनीवर आयोजित केल्याचा दावा एका मौलवीने केल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले, “वक्फच्या बहाण्याने घेतलेल्या प्रत्येक इंच जमिनीवर राज्य सरकार पुन्हा दावा करेल.” ते म्हणाले, “कुंभ हे हजारो वर्षांपासून भारताच्या वारशाचे प्रतीक आहे आणि येथे नेहमीच होत आले आहे. ते वक्फ बोर्ड नसून भूमाफियांचे मंडळ आहे.” आदित्यनाथ म्हणाले की सरकार अशा सर्व ताब्यात घेतलेल्या जमिनीची चौकशी करत आहे आणि कायद्यात सुधारणा करण्यात आल्या आहेत. “जिथे ‘वक्फ’ हा शब्द दिसतो, तेथे मूळ जमीन कोणाच्या नावावर नोंदवली गेली हे तपासले जाईल आणि ती जमिन हक्काच्या मालकांना परत करण्याचा प्रयत्न केला जाईल”, असंही आश्वासन योगी आदित्यनाथ यांनी दिलं.

“२०१३ मध्ये, मॉरिशसचे पंतप्रधान गंगेत पवित्र स्नान करण्यासाठी भारतात आले होते, तेव्हा कुंभ दरम्यान प्रदूषण, अस्वच्छता आणि गैरव्यवस्थापन पाहून ते परत गेले”, असे आदित्यनाथ म्हणाले. २०१३ मध्ये राज्यात समाजवादी पक्षाची सत्ता होती, तेव्हा अखिलेश यादव मुख्यमंत्री होते.

ते म्हणाले की, “सरकारच्या डबल इंजिनच्या कामामुळे गंगा आता स्वच्छ झाली आहे. जेव्हा २०१९ मध्ये मॉरिशियन पंतप्रधानांनी वाराणसीला भेट दिली, तेव्हा त्यांनी प्रयागराजला भेट दिली जिथे कुंभ सुरू होता. सहा वर्षांत झालेला बदल पाहून त्यांनी आपल्या कुटुंबासह संगमात पवित्र स्नान केले”, अशी आठवणही योगी आदित्यनाथ यांनी सांगितली.

Story img Loader