‘न्यू दिल्ली टेलिव्हिजन लिमिटेड’ अर्थात एनडीटीव्ही या वृत्त प्रसारण वाहिनीचे संस्थापक-प्रवर्तक प्रणॉय आणि राधिका रॉय यांनी प्रवर्तक कंपनी ‘आरआरपीआर होल्डिंग्ज’ म्हणजेच आरआरपीआरएचच्या प्रवर्तक (प्रमोटर) पदाचा राजीनामा देऊन जवळजवळ एक महिना झाला आहे. एनडीटीव्हीमध्ये सर्वात मोठी गुंतवणूक ही आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या गौतम अदानी यांची आहे. अदानी समूहातील तीन कंपन्यांनी ‘न्यू दिल्ली टेलिव्हिजन लिमिटेड’ अर्थात एनडीटीव्ही या वृत्त प्रसारण वाहिनीमधील २९.१८ टक्के भागभांडवलाच्या अप्रत्यक्ष अधिग्रहणानंतर याच वर्षी ऑगस्ट महिन्यात कंपनीमधील आणखी २६ टक्के हिस्सेदारी थेट विकत घेण्यासाठी तिच्या विद्यमान भागधारकांपुढे ५ डिसेंबरपर्यंत खुला प्रस्ताव ठेवला होता. हा प्रस्ताव मुदतीआधीच स्वीकारण्यात आल्यानंतरच रॉय दांपत्याने आपल्या पदांचा राजीनामा दिला होता.

अदानींकडून देण्यात आलेली ही खुली ऑफर आणि नंतर झालेला व्यवहार यासंदर्भात पहिल्यांदाच एनडीटीव्हीचे संस्थापक असलेल्या प्रणॉय रॉय आणि राधिका रॉय यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. हा व्यवहार नेमका कसा झाला आणि भविष्यात ते एनडीटीव्हीकडे कसे पाहतात त्याचप्रमाणे अदानींकडून त्यांना काय अपेक्षा आहेत यासंदर्भातील एक पत्रकच त्यांनी जारी केलं आहे. एनडीटीव्हीच्या वेबसाईटवरही रॉय यांची भूमिका मांडणारं स्टेटमेंट जारी करण्यात आलं आहे.काय म्हटलं आहे या स्टेटमेंटमध्ये पाहूयात…

Asaduddin-Owaisi-1
ताजमहलच्या गळतीवरून असदुद्दीन ओवेसींचे भारतीय पुरातत्व विभागाच्या कार्यपद्धीवर ताशेरे; म्हणाले, “हे म्हणजे १० वीत नापास विद्यार्थ्याने…”
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
kolkata doctor rape case trinamool congress vs bjp controversy more intense after sc comment
सुनावणीनंतर राजकीय वाद; निदर्शनांमागे केंद्राचे कारस्थान बॅनर्जी; चेहरा उघड झाल्याची भाजपची टीका
congress welcomes president Draupadi murmu
राष्ट्रपतींनी संपूर्ण देशाचा आक्रोश व्यक्त करावा! महिला अत्याचारसंबंधी द्रौपदी मुर्मू यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसची अपेक्षा
kevan parekh apple cfo
अ‍ॅपलचे नवे ‘सीएफओ’ भारतीय वंशाचे; कोण आहेत केवन पारेख?
national human rights commission orders police inquiry into detaining rti activist
माहिती अधिकार कार्यकर्त्याला केले नजरकैद; पोलिसांच्या चौकशीचे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे आदेश
wfi president sanjay singh comment on vinesh phogat
विनेशने कुस्तीत राजकारण करू नये!‘डब्ल्यूएफआय’चे अध्यक्ष संजय सिंह यांची टिप्पणी
Piyush Goyal expressed concern over rapid expansion of e commerce companies in India
बहरते ‘ई-कॉमर्स’, साफल्य नव्हे चिंतेची बाब; गोयल

आम्ही १९९८ मध्ये एनडीटीव्ही सुरु केलं तेव्हा आमचा विश्वास होता की भारतीय पत्रकारिता ही जगतिक स्तरावरील असली तरी तिला अधिक सक्षम आणि चांगल्या ब्रॉडकास्ट फ्लॅटफॉर्मची गरज आहे. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून पत्रकारिता अधिक वाढेल आणि जगभरामध्ये चर्चेचा विषय ठरेल अशी आमची अपक्षा होती.

३४ वर्षानंतर आज आम्हाला विश्वास वाटतो की एनडीटीव्ही ही अशी एक संस्था झाली आहे जिने आमच्या अनेक इच्छा आणि कल्पनांची पूर्तता केली. आम्हाला फार अभिमान वाटतो की जगभरामध्ये एनडीटीव्हीची ‘भारत आणि आशियामधील सर्वात विश्वासार्ह न्यूज ब्रॉडकास्टर’ अशी ओळख निर्माण झाली आहे.

नुकत्याच देण्यात आलेल्या खुल्या ऑफरनंतर सध्या एएमजी मिडिया नेटवर्क ही कंपनी एनडीटीव्हीमधील सर्वात मोठी समभागधारक कंपनी ठरली आहे. त्यामुळेच, परस्पर सामंजस्याने आम्ही एनडीटीव्हीमधील आमचे बहुतांश शेअर्स एएमजी मीडिया नेटवर्कला विकण्याचा निर्णय घेतला आहे.

या व्यवहारासंदर्भात खुली ऑफर देण्यात आल्यानंतर गौतम अदानी यांच्याशी आमची सविस्तर चार्चा झाली. आम्ही केलेल्या सर्व सूचना त्यांनी सकारात्मकपणे ऐकून घेतल्या आणि त्यातील सर्वच सूचना त्यांनी अगदी मोकळेपणाने स्वीकारल्या.

अदानी यांनी विश्वास, विश्वासार्हता आणि स्वातंत्र्य या शब्दांसाठी समानार्थी नावाने ओळखल्या जाणाऱ्या या ब्रँडमध्ये गुंतवणूक केली आहे. आम्हाला अपेक्षा आहे की ते (गौतम अदानी) या मूल्यांचे जतन करतील. तसेच ते या अशाप्रकारच्या संस्थेला आवश्यक असलेलं नेतृत्व म्हणून सर्व जबाबदाऱ्या योग्य पद्धतीने पार पाडतील.

आम्ही भविष्यात एनडीटीव्ही आणि त्याचे उत्कृष्ट पत्रकार, निर्माते आणि संपूर्ण टीमकडूनच चांगल्या कामाची अपेक्षा करत आहोत. आम्ही एनडीटीव्ही पाहत राहणार. भारताला अभिमान वाटावा अशा पुढील विकासाच्या टप्प्यावर एनडीटीव्हीला ही टीम घेऊन जाईल हे पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.

– राधिका रॉय आणि प्रणॉय रॉय
संस्थापक, एनडीटीव्ही