अयोध्येतील राम मंदिरात २२ जानेवारीच्या दिवशी रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या सोहळ्याला देश-विदेशातले लोक उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. रामलल्लाची बालरुपातली मूर्ती आणि शिल्पकार अरुण योगीराज यांनी घडवलेली कृष्ण शिळा या दगडापासून घडवण्यात आलेल्या ५१ इंची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या मूर्तीचे फोटो व्हायरल झाले आहेत. तसंच ही मूर्ती ५१ इंची आहेत. ही मूर्ती उभ्या रुपात आहे. तसंच कालपर्यंत या मूर्तीचे डोळे झाकण्यात आले होते. मात्र आता मूर्तीचं पूर्ण दर्शन सगळ्यांना झालं आहे. गुरुवारी ही मूर्ती गाभाऱ्यात आणण्यात आली. या मूर्तीच्या हातात सोन्याचा धनुष्य-बाण असणार आहे. तसंच या मूर्तीची इतरही वैशिष्ट्ये आहेत ती आपण जाणून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रामलल्लाच्या मूर्तीची वैशिष्ट्ये काय?

रामलल्लाच्या मूर्तीच्या सर्वात वरच्या भागात स्वस्तिक, ओम, चक्र, गदा आणि सूर्याची आकृती कोरण्यात आली आहे.

मूर्तीच्या डाव्या हातात सोन्याचं धनुष्य आणि उजव्या हातात सोन्याचा बाण आहे.

याशिवाय रामलल्लाच्या मूर्तीच्या बाजूला विष्णूचे दशावतार आहेत. मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि कल्कि यांच्या आकृत्या कोरण्यात आल्या आहेत.

कमळ, हनुमान आणि गरुडही या मूर्तीवर आहेत.

रामाच्या या मूर्तीचं वजन २०० किलो आहे. तर उंची ५१ इंची आहे.

रामलल्लाची मूर्ती ५१ इंची का?

रामलल्लाची मूर्ती ५१ इंची उंचीची ठेवण्यात आली आहे. कारण भारतात सर्वसाधारणपणे पाच वर्षांच्या मुलाची उंची ही तितकीच असते. तसंच ५१ हा शुभ अंक मानला गेला आहे. त्यामुळे मंदिराच्या गाभाऱ्यात प्राणप्रतिष्ठा करुन स्थापन करण्यात येणारी मूर्ती ५१ इंची आहे. या मूर्तीची निर्मिती कृष्ण शिळा या दगडात कोरीव काम करुन करण्यात आली आहे. हिंदू देव-देवतांच्या मूर्ती या खासकरुन कृष्ण शिळा दगडापासूनच तयार केल्या जातात.

हे पण वाचा- “प्रभू रामाचं अस्तित्वच नाकारणारे लोक प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात…”, विरोधकांवर देवेंद्र फडणवीस यांची घणाघाती टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी २२ जानेवारीच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होतील. प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर रामाचं मंदिर सगळ्या भक्तांसाठी खुलं होणार आहे. रामजन्मभूमी ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी हे म्हटलं होतं की प्राणप्रतिष्ठा सोहळा दुपारी १२.२० रोजी सुरु होईल. दुपारी १ वाजेपर्यंत हा सोहळा पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Statue of ramlala in ayodhya ram temple ram mandir pran pratishta special things in idol scj
Show comments