हिंदुस्थान झिंक लिमिटेडच्या निर्गुंतवणूक प्रक्रियेतील अनियमिततेच्या आरोपावरून स्टर्लाईट उद्योगसमुहाचे प्रमुख अनिल अग्रवाल यांची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती लोकसभेत देण्यात आली. एनडीएच्या १९९७ ते २००३ वर्षाच्या कार्यकाळात झालेल्या कंपनीच्या निर्गुंतवणूक प्रक्रियेबाबत सीबीआयकडून अग्रवाल यांची प्राथमिक चौकशी करण्यात येणार असल्याची लेखी माहिती अर्थराज्य मंत्री जेडी सलीम यांनी दिली. सीबीआयच्या जोधपूर विभागाकडून तक्रारदाराने दिलेल्या तोंडी माहितीच्या आधारे ६ नोव्हेंबर २०१३ रोजी हिंदुस्थान झिंक लिमिटेडच्या निर्गुंतवणूक प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार केल्याच्या संशयावरून अनिल अग्रवाल आणि अन्य काही जणांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते.
स्टर्लाईट उद्योगाचे प्रमुख अनिल अग्रवाल सीबीआयच्या रडारवर
हिंदुस्थान झिंक लिमिटेडच्या निर्गुंतवणूक प्रक्रियेतील अनियमिततेच्या आरोपावरून स्टर्लाईट उद्योगसमुहाचे प्रमुख अनिल अग्रवाल यांची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती लोकसभेत देण्यात आली.
First published on: 07-02-2014 at 08:17 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sterlite industries chief anil agarwal under cbi probe on basis of oral information minister