न्यू जर्सी येथील एका व्यक्तीने लाखो डॉलरच्या चोरीच्या भारतीय कलाकृती विकण्यात भूमिका पार पाडल्याची कबुली दिली आहे. जगातील अनेक संग्रहालयांना या चोरीच्या कलाकृती विकण्यात आल्या होत्या, त्यात एका भारतीय कलाकृती वितरकास त्याने मदत केल्याचे स्पष्ट झाले आहे.
मॅनहटन येथील ‘आर्ट ऑफ द पास्ट’ येथे व्यवस्थापक अॅरॉन फ्रीडमन (वय ४१) हा वीस वर्षे काम करीत होता. ही आर्ट गॅलरी सुभाष कपूर यांच्या मालकीची असून चोरी करून आणण्यात आलेले बौद्ध व हिंदू पुतळे विकण्यात त्यांचा सहभाग होता. फ्रीडमन याने चोरीच्या कलाकृती विकल्या प्रकरणी पाच आरोप कबूल केले आहेत. कटाचा एक भाग म्हणून फ्रीडमन हा चोरीच्या कलाकृती जगातील संग्रहालयांना विकण्यास मदत करीत असे. त्यात शिवनटराजाची भारतातील शिवमंदिरातून लुटलेली मूर्ती ५० लाख डॉलर्सना विकण्यात आली, ती आता ऑस्ट्रेलियातील संग्रहालयात आहे. भारहुत स्तूप याकसी खांबाचे शिल्प १.५ कोटी डॉलरला विकले गेले असून ते आता अमेरिकी संघराज्याच्या ताब्यात आहे. एकूण ३.५ कोटींच्या कलाकृती विकल्याची कबुली त्याने दिली आहे.
कपूर हा सध्या भारतीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात असून त्यांच्यावर खटल्यात मदत करण्याचे व अंतर्गत सुरक्षा चौकशी संस्थेला आणखी माहिती देण्याचे त्याने कबूल केले आहे. कपूर याच्यावर न्यूयॉर्क परगण्यात चोरीच्या वस्तू ताब्यात ठेवल्याचा आरोप आहे. कपूर हा मोठा तस्कर असून त्याच्याकडे मोठी बाजार किंमत असलेल्या चोरीच्या कलाकृती सापडल्या आहेत, असे चौकशी पथकाचे मुख्य जेम्स हेस यांनी सांगितले. २००७ पासून ७१५० कलाकृती संबंधित २६ देशांना परत करण्यात आल्या असून त्यात फ्रान्स, जर्मनी, पोलंड व ऑस्ट्रिया या देशांचा समावेश आहे. या कलाकृतीत १५ व्या व १८ व्या शतकातील इटली व पेरू देशातील हस्तलिखिते व चीन, कंबोडिया व इराकमधील कलावस्तू यांचाही समावेश होता.
नेल्सन मंडेला यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी कोलकाता येथे मूक मोर्चा आयोजित करण्यात आला होता.
भारतातून चोरलेल्या मौल्यवान कलावस्तूंची विक्री
न्यू जर्सी येथील एका व्यक्तीने लाखो डॉलरच्या चोरीच्या भारतीय कलाकृती विकण्यात भूमिका पार पाडल्याची कबुली दिली आहे.
First published on: 08-12-2013 at 03:31 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stolen indian antique pieces set to sell in new jersey