हरियाणात सोमवारी ( ३१ जुलै ) दोन गटात राडा झाला आहे. दोन गटांकडून झालेल्या दगडफेकीत २ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. मेवात जिल्ह्यातील नूह येथे ही घटना घडली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मिळालेल्या माहितीनुसार, विश्व हिंदू परिषद आणि मातृशक्ती दुर्गा वाहिनीकडून ब्रडमंडळ यात्रा काढण्यात आली होती. ही यात्रा नूह येथील तिरंगा पार्क येथे पोहचल्यावर दुसऱ्या एका गटाबरोबर वाद झाला. या वादाचे रुपांतर दगडफेकीत झालं. यानंतर अनेक गाड्यांची जाळपोळ करण्यात आली आहे.

या दगडफेकीत दोन पोलिसांचा मृत्यू झाला आहे. तर ७ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी १ हजारांहून अधिक जवान तैनात करण्यात आले आहेत.

या घटनेनंतर नूह शहरातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे. आज ( १ ऑगस्ट ) नूह येथील सर्व शाळा आणि कॉलेजला सुट्टी देण्यात आली आहे. फरीदाबाद येथील शाळा आणि कॉलेज बंद ठेवण्यात आले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stone pelting hindu group shobha yatra in haryana nuh 2 death 7 injured bikes burn ssa