गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका काही दिवसांनी पार पडणार आहेत. त्यापूर्वी गुजरातमधील परिस्थिती बिघडत चालल्याचं दिसत आहे. वडोदरा शहरात दिवाळी दिवशीच दगडफेकेची घटना घडली आहे. वडोदऱ्यातील पाणीगेट येथे ही घटना समोर आली आहे. माहिती मिळताच तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, वडोदरा शहरातील पाणीगेट येथे दगडफेक आणि जाळपोळीची घटना घडली आहे. यादरम्यान एक मुस्लीमाच्या मेडिकल सेंटरवर दगडफेकही करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ पाणीगेट परिसरात दाखल झाले. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.