मालदीव भारताला देणं लागतो. त्यामुळे ही कर्जमुक्ती करावी, अशी मागणी आता मालदीवकडून केली जातेय. गेल्या काही महिन्यांत मालदीव आणि भारत यांच्यातील संघर्ष वाढला होता. संघर्षानंतरही मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोइझ्झू यांनी कर्जमुक्तीची विनंती केली होती. आता, मालदीवचे माजी राष्ट्राध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलिह यांनीही मोइझ्झू यांना भारताशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याची मागणी केली आहे. तसंच, मोइझ्झू यांनी हट्टीपणा सोडण्याचा सल्ला दिला आहे.
“मला खात्री आहे की आमचे शेजारी मदत करतील. आपण हट्टीपणा सोडून संवाद साधला पाहिजे. आम्हाला मदत करणारे अनेक पक्ष आहेत. पण मुइझ्झू तडजोड करू इच्छित नाही. मला असे वाटते की त्यांना आताच परिस्थिती समजू लागली आहे”, असं सोलिह यांनी Adhadhu.com या न्यूज पोर्टलला सांगितले. सोलिह पुढे म्हणाले की, आर्थिक आव्हाने हे भारतीय कर्जांचे परिणाम नाहीत. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत ४५ वर्षीय मुइझू यांनी ६२ वर्षीय सोलिह यांचा पराभव केला होता.
मालदीववर चीनचे MVR १८ अब्ज कर्ज आहे. तर या कर्जाची परतफे २५ वर्षांत करायची आहे, अशी माहिती सोलिह यांनी दिली. तर, मालदीवने गेल्या वर्षाच्या अखेरीस भारताकडे अंदाजे ४०० डॉलर मिलिअन देणे बाकी आहे. माजी राष्ट्रपती असेही म्हणाले की सरकार जनतेची फसवणूक करत आहे आणि एमडीपी सरकारने सुरू केलेले प्रकल्प पुन्हा सुरू करत आहेत, असे ते म्हणाले.