कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या बहीण आणि आईच्या मुंबईतील मालमत्तांवर जप्ती आणण्याची प्रक्रिया थांबवण्याचे आदेश सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत़  मुंबईतील राहाते घर ताब्यात घेण्याच्या शासनाच्या आदेशाविरुद्ध, दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती टी़  एस़  ठाकूर आणि एफ ़ एम़  आय़  कालिफुल्ला यांच्या खंडपीठाने केंद्र शासनाला नोटीसही बजावली आह़े
या दोन महिलांच्या नावावर कोटय़वधी रुपयांच्या सात मालमत्ता आहेत़  त्यापैकी दोन दाऊदची मृत आई अमिना बी हिच्या नावावर दोन, तर बहीण हसीना इब्राहिम पारकर हिच्या नावावर पाच मालमत्ता आहेत़  या मालमत्ता दाऊदने चुकीच्या मार्गाने कमावलेल्या पैशातून मिळवल्याचा शासनाचा आरोप आह़े  त्यामुळे एसएएफईएमए कायद्यांतर्गत या मालमत्तांच्या जप्तीचे आदेश देण्यात आले होत़े
या आदेशाविरुद्धची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर हसिना हिने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती़  जप्तीची माहिती देणारी नोटीस योग्य कालावधीत देण्यात आली नव्हती़  त्यामुळे दक्षिण मुंबईतील नागपाडा येथील मालमत्ता ताब्यात घेण्याची प्रक्रिया बेकायदेशीर आहे, असे सांगत जप्तीच्या नोटिशीला आव्हान देण्याची आणखी एक संधी देण्यात यावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांच्या वकिलाने या वेळी केली होती़.

Story img Loader