उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री योगेंद्र उपाध्याय यांचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. यामध्ये ते शहीद कॅप्टन शुभम गुप्ता यांच्या आईला धनादेश देत आहेत. परंतु, त्यांच्या आईचा रडवेला चेहरा पाहूनही मंत्र्यांनी फोटोसाठी पोज दिली. एवढंच नव्हे तर हे प्रदर्शन बंद करा, असंही शुभम गुप्ता यांच्या आई म्हणाल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राजौरीमध्ये झालेल्या चकमकीत कॅप्टन शुभम गुप्ता यांनी वीरमरण प्राप्त झालं. त्यामुळे योगी आदित्यनाथ सरकारमधील कॅबिनेट मंत्री योगेंद्र उपाध्याय गुरुवारी त्यांच्या घरी त्यांच्या आईला भेट देण्याकरता गेले होते. तेथे त्यांनी त्यांच्या आईला धनादेश दिला. हा धनादेश त्यांच्या आईने नाकारला. “हे प्रदर्शन बंद करा, माझा मुलगा शुभमला परत आणा”, असं शुभम गुप्ता यांची माऊली रडवेल्या चेहऱ्याने सांगत होती. परंतु, जबरदस्तीने हा धनादेश त्यांच्या हाती सुपूर्द करत योगेंद्र उपाध्याय यांनी फोटो काढण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

हेही वाचा >> दोन कॅप्टन, दोन जवान शहीद; जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत मेजरसह अन्य एक जवान जखमी

हा व्हिडीओ शेअर करत काँग्रेसने गिधाडे असं कॅप्शन दिलं आहे. तर, ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी निर्लज्ज आणि असंवेदनशील अशी टीका केली आहे.

राजौरीच्या बाजीमाल भागात दोन दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कर आणि जम्मू- काश्मीर पोलिसांच्या संयुक्त पथकाने रविवारपासून शोधमोहीम सुरू केली होती. सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांमध्ये बुधवारी चकमक झाली. त्यात लष्कराचे दोन कॅप्टन आणि दोन जवान शहीद झाले असून, एका मेजरसह अन्य एक जवान जखमी झाला. जखमींना उधमपूरच्या लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stop this exhibition says army officers grieving mother up minister unmoved sgk
Show comments