नवीन वर्षाच्या स्वागतासाठी देशभरातील विविध शहरांत जल्लोष पाहायला मिळाला. अनेक शहरातील महत्त्वाच्या ठिकाणांवर गर्दी झाली होती. तरुणाईने रस्त्यावर उतरून नवीन वर्षाचे स्वागत केले. एकीकडे हा उत्साह सुरू असताना दुसरीकडे एका होतकरू फोटोग्राफर तरुणीने स्वतः आयुष्य संपवलं आहे. फोटोशूट करायला नकार दिल्याने तिने आत्महत्या केल्याची माहिती समोर येतेय. बंगळुरूत ही घटना घडली.

वर्शिनी आर ही एका खासगी महाविद्यालयात बीबीएच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होती. तिला फोटोग्राफीची प्रचंड आवड होती. याकरता तिने फोटोग्राफीचं शास्त्रशुद्ध शिक्षणही घेतलं होतं. शिक्षणानंतर तिच्यातील आवड बळावत गेली. त्यामुळे ती मिळेल तिथे फोटो काढत असे. या उद्देशाने नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ती बाहेर जाऊन फोटोग्राफी करणार होती. परंतु, बाहेर गर्दी असेल या कारणाने तिच्या पालकांनी तिला बाहेर जाण्यास नकार दिला. पालकांनी नकार दिल्याने रागावलेल्या वर्शिनी या २१ वर्षीय तरुणीने स्वतःचं आयुष्य संपवलं. वर्शिनीचे वडील राजन्ना यांनी याप्रकरणी विल्सन गार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

girl bedroom
“माझ्या बेडरुममध्ये…”, जेईईचा अभ्यास करणाऱ्या मुलीवर पाळत ठेवण्याकरता पालकांचा ‘हा’ निर्णय तुम्हाला पटतो का?
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
deepika padukone ranveer singh christmas celebration with baby Dua
Christmas 2024: वरुण धवनने पहिल्यांदाच शेअर केला ६ महिन्यांच्या लेकीचा फोटो; दीपिका-रणवीरने मुलीसह ‘असं’ केलं सेलिब्रेशन
Pankit Thakker and his wife Prachi Thakker divorce
प्रसिद्ध अभिनेत्याचा २४ वर्षांचा संसार मोडला, २१ व्या वर्षी वयाने मोठ्या अभिनेत्रीशी कुटुंबियांचा विरोध पत्करून केलेलं लग्न
Lokstta lokrang Journalism Law Director Documentary
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले:  कॅमेरा अँगल आणि जंपकट्स पलीकडले…
Women World, Feminist Thought ,
स्त्री ‘वि’श्व : लोकल भी, ग्लोबल भी!
Pradhan Mantri Rashtriya Bal Puraskar
स्वत:ला आगीत झोकून सिलिंडर बाहेर काढणाऱ्या करिनाच्या धाडसाची दखल…
Marathi actress tejashri Pradhan talk about her future life partner
अभिनेत्री तेजश्री प्रधानला ‘असा’ हवाय जोडीदार, म्हणाली, “फक्त नात्यात…”

पोलीस तक्रारीत राजन्ना म्हणाले, वर्शिनी माझी तिसरी मुलगी होती. एका खासगी संस्थेतून तिने फोटोग्राफीचं शिक्षण घेतलं होतं. आमच्या मोबाईलमध्ये तिने शेकडो फोटो क्लिक केले होते. तिची फोटोग्राफीची आवड लक्षात घेऊनच आम्ही तिला फोटोग्राफीचं शिक्षण दिलं होतं. रविवारी वार्शिनी हिने नवीन वर्षाच्या स्वागतासाठी बाहेर जाऊन फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु, बाहेर भरपूर गर्दी असेल. तसंच अशा गर्दीच्या ठिकाणी जाणं धोक्याचं ठरेल या कारणाने आम्ही तिला बाहेर जाण्यास नकार दिला. यामुळे ती आमच्यावर रागावली आणि तिच्या खोलीत निघून गेली. मध्यरात्री मला जाग आली. तिने काही खाल्लं नसेल म्हणून मी तिला खाण्यासाठी उठवायला गेलो. परंतु, तिने खोलीतून काहीच प्रत्युत्तर दिलं नाही. मी घाबरल्याने लागलीच खोलीचा दरवाजा तोडला. तेव्हा मी पाहिलं की तिने गळफास घेतला होता. मी तिला तत्काळ KIMS रुग्णालयात दाखल केलं. परंतु, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

Story img Loader