Sunita Williams Return on Earth : नासामधील भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बॅरी विल्मोर आठ दिवसांसाठी बोईंग स्टारलायनरच्या चाचणी मोहिमेसाठी अंतराळात गेले होते. परंतु, त्यांना अंतराळात जाऊन आता आठ महिने उलटून गेले आहेत. यानात बिघाड झाल्यामुळे त्यांच्या परतीच्या मार्गात अडचणी निर्माण झाल्या आहेत. परंतु, आता त्यांच्या परतीचा मार्ग मोकळा झाला आहे. मार्च महिन्यात हे दोघेही पृथ्वीतलावर उतरणार आहेत. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सीएनएनशी साधलेल्या संवादात सुनीता विल्यम्स आणि त्यांचा सहकारी बुच विल्मोर यांनी क्रू १० मिशन १२ मार्चला पृथ्वीतलावर लॉन्च करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं आहे. तसंच, १९ मार्च रोजी ते त्यांच्या घरी परततील.

कसं असेल बचावकार्य?

क्रू १० मिशनमध्ये नासामधील ४ अंतराळवीर असणार आहे. अॅने मॅकक्लेन, निकोल अयेर्स, जपान एरोस्पेस एक्स्प्लोरेशन एजन्सीचे अंतराळवीर ताकुया ओनिशी, रॉसकॉसमॉस कॉसमॉनट किरील पेस्कॉव हे या मिशनमध्ये सहभाग आहेत. सहा महिन्यांच्या मोहिमेसाठी ते अंतराळात जाणार आहेत. क्रू-१० च्या आगमनानंतर, दोन्ही अंतराळवीर आठवडाभर चालणाऱ्या हस्तांतरण प्रक्रियेत सहभागी होतील. त्यानंतर एक नवीन अंतराळ स्थानक कमांडर पदभार स्वीकारेल. सध्या, सुनीता विल्यम्स या फ्लाइंग लॅबोरेटरीच्या कमांडर आहेत.

नेमकं काय घडलं?

सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांनी गेल्या वर्षी ५ जून रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या बोईंग स्टारलाइनरमध्ये उड्डाण केले होते आणि तेव्हापासून अंतराळयानातील तांत्रिक अडचणींमुळे ते अडकले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पेसएक्सचे एलोन मस्क यांना अंतराळातून या अंतराळवीरांना घेऊन येण्यास सांगितले आणि त्यांच्या परतीची त्वरित सोय करण्याची विनंती केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचा हस्तक्षेप

“मी नुकतेच एलोन मस्क आणि स्पेसएक्सला बायडेन प्रशासनाने अवकाशात अडकलेल्या दोन धाडसी अंतराळवीरांना परत आणण्यास सांगितले आहे. ते अनेक महिन्यांपासून अंतराळ स्थानकात अडकले आहेत. एलॉन लवकरच त्यांना पृथ्वीतलावर आणेल. आशा आहे की, सर्वजण सुरक्षित असतील. शुभेच्छा एलॉन!!!,” डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल प्लॅटफॉर्मवर लिहिले.

स्पेसएक्सने नासाच्या कमर्शियल क्रू प्रोग्राममधून सुमारे $3 अब्ज निधी मिळवून त्यांचे क्रू ड्रॅगन कॅप्सूल विकसित केले. “मानवी अंतराळयान हे अनपेक्षित आव्हानांनी भरलेले आहे. नासा आणि स्पेसएक्समधील प्रचंड भागीदारीमुळे आमची ऑपरेशनल लवचिकता सक्षम झाली आहे आणि स्पेसएक्स एजन्सीच्या उदयोन्मुख गरजा सुरक्षितपणे पूर्ण करण्यासाठी सतत चपळता दाखवत आहे”, असे नासाच्या कमर्शियल क्रू प्रोग्रामचे व्यवस्थापक स्टीव्ह स्टिच म्हणाले.