हृदयविकार हा स्त्रियांमध्येही वाढतो आहे. विशेषत चाळिशीनंतर त्यांच्यात हा धोका वाढतो. बदलत्या आहार व जीवनशैलीमुळे त्यात भरच पडत आहे. अलीकडच्या संशोधनानुसार स्ट्रॉबेरी व ब्लूबेरी यांच्या सेवनाने स्त्रियांमध्ये ह्रदयविकाराचे प्रमाण एकतृतीयांशाने कमी होते. बेरी वर्गातील फळांमुळे धमन्या अवरुद्ध होण्याचे प्रमाण कमी होते, त्यामुळे हा धोका टळतो.

फ्लॅवनॉइडसचा फायदा
वनस्पतींमध्ये फ्लॅवनॉइड्स नावाची अँटीऑक्सिडंट असतात, त्यामुळे हृदयविकार, अतिरक्तदाब, अनेक प्रकारचे कर्करोग, निद्रानाश यांसारख्या अनेक विकारांवर काहीअंशी मात करता येते. हे फ्लॅवनॉइड्स केवळ स्ट्रॉबेरी व ब्लूबेरीत असतात असे नाहीतर चहा व रेड वाइनमध्येही ते असतात.

Successful treatment of an elderly woman suffering from hernia and comorbidities Pune news
हर्नियासह सहव्याधींनी ग्रस्त ज्येष्ठ महिलेवरील उपचारांचे आव्हान, दोन महिन्यांच्या प्रयत्नांनंतर यशस्वी
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Consuming too many fruits every day can cause various health issues said doctors
तुम्हाला रोज जास्त फळे खाण्याची सवय आहे? मग शरीरावर होऊ शकतो ‘हा’ परिणाम, वाचा तज्ज्ञ काय सांगतात…
Banana health benefits
दररोज एक केळे खाल्ल्याने तुम्ही निरोगी राहू शकता? तज्ज्ञ काय सांगतात…
Winter special recipe in marathi Eat sweet and sour tomato chutney with jaggery to stay healthy during winters
हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी खा गुळ-टोमॅटोची चटणी; रेसिपी आहे एकदम सोपी
Black Plastic Kitchenware May Look Nice But Could Be Harming Your Health: Latest Study Finds
महिलांनो तुम्हीही स्वयंपाकघरात काळी भांडी वापरता? परिणाम वाचून पायाखालची जमीन सरकेल
Onion prices fall due to increased production
नाशिक : आवक वाढल्याने कांद्याची घसरण
mahabaleshwar strawberries will reach every household through post with special stamp
स्ट्रॉबेरी आता सचित्र टपाल शिक्क्यावर

संशोधन
महिलांमधील हृदयविकारावर यूएस इनव्हेस्टिगेशन ऑफ विमेन्स हेल्थ या संस्थेने संशोधन केले. त्यात २५ ते ४२ वयोगटातील महिलांकडून प्रश्नावली भरून घेण्यात आली, तसेच त्यांचा आहार व आरोग्य यांचे अठरा वर्षे निरीक्षण करण्यात आले.

बेरीज फळांची जादू
ज्या महिलांनी आठवडय़ातून तीनदा स्ट्रॉबेरी व ब्लूबेरीजचे सेवन केले, त्यांच्यात हृदयविकाराचे प्रमाण ३२ टक्क्यांनी कमी होते. अगदी फळे व भाज्या आहारात असल्या व स्ट्रॉबेरी, ब्लूबेरीचा त्यात समावेश नसेल तर हृदयविकाराचे प्रमाण जास्त राहू शकते.

नेमके काय घडते?
स्ट्रॉबेरी, ब्लूबेरीजमध्ये अँथोसायनिन हे फ्लॅवनॉइड्स असते व त्यामुळे हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्या मोकळय़ा होतात, या रक्तवाहिन्यांच्या आतल्या भागात मेदाचा थर साचण्यास प्रतिबंध केला जातो.

स्त्रियांनी आहारात ब्लूबेरी व स्ट्रॉबेरीचा समावेश केला तर त्याचा खूप चांगला परिणाम दिसून येतो.
डॉ. एरिक रीम, हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ, बोस्टन.

अगदी सुरुवातीपासून स्ट्रॉबेरी व ब्लूबेरीजचे सेवन केले तर नंतरच्या काळात हृदयविकाराची शक्यता कमी होते.
 आहारतज्ज्ञ डॉ. एडिन कॅसिडी, युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट अँगलिआ

तांबडय़ा व जांभळय़ा रंगाची ब्लूबेरी, ब्लॅकबेरी व स्ट्रॉबेरी ही फळे तरुण व मध्यमवयीन महिलांत ह्रदयविकाराचे प्रमाण कमी करतात असे या संशोधनात दिसून आले.
 व्हिक्टोरिया टेलर, आहारतज्ज्ञ, ब्रिटिश हार्ट फाऊंडेशन.

Story img Loader