दहशतवाद्यांना आर्थिक साहाय्य करणाऱ्या ३६ हून अधिक कंपन्यांची जवळपास २.१२ कोटी रुपयांची मालमत्ता भारताने गोठविली आहे. दहशतवादाला आर्थिक साहाय्य करण्याविरोधातील एफएटीएफ या जागतिक पातळीवरील संस्थेने आपल्या अहवालात ही बाब उघड केली आहे.
आयसिसच्या जगभरातील वाढत्या कारवायांच्या पाश्र्वभूमीवर या संस्थेने विविध देश आणि आर्थिक सत्ता यांचा आढावा घेतला त्यानंतर हा अहवाल सादर केला. दहशतवादासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा संशय असलेल्या ३७ कंपन्यांची २.१२ कोटी रुपयांची मालमत्ता भारताने गोठविली आहे.

Story img Loader