IIT BHU Molestation Case: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी-बनारस हिंदू विद्यापीठ (IIT-BHU) च्या एका विद्यार्थिनीने तीन अज्ञात व्यक्तींनी कॅम्पसमध्ये तिचा विनयभंग केल्याचे सांगितल्यावर विद्यापीठाच्या आवारात गुरुवारी मोठ्या स्तरावर निदर्शने झाली. सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांनी राजपुताना वसतिगृह क्रॉसिंगवर आणि नंतर आयआयटी-बीएचयू संचालकांच्या कार्यालयाजवळ बसून आंदोलन केले होते. आरोपींना अटक करण्यात यावी व कॅम्पसमधील सुरक्षा योजना अपयशी ठरल्याने संचालकांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांना केली.

IIT-BHU मध्ये विनयभंग, नेमकं प्रकरण काय?

पोलीस संचालकांच्या हवाल्याने टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या तक्रारीवरून, पोलिसांनी गुरुवारी सकाळी ७.२० वाजता आयपीसी कलम ३५४ बी, (महिलेवर जबरदस्ती), ५०६ (गुन्हेगारी धमकी) आणि आयटी कायद्याच्या ६६ई अंतर्गत एफआयआर दाखल केला आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार ही घटना पहाटे १.३० च्या सुमारास घडली होती. संस्थेच्या अधिका-यांनी पहाटे 3 च्या सुमारास याबाबत पोलिसांनी माहिती दिल्यावर लंका पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले होते.

Boy Dancing With Girl in Rain Friend spoil the moment
“असे मित्र कोणालाही भेटू नये”, भर पावसात मैत्रिणीबरोबर डान्स करत होता तरुण अन् मित्रांनी….Video Viral
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
A case has been filed against two people including the former working president of pune vidyarthi gruha Pune news
पुणे विद्यार्थी गृहाच्या माजी कार्याध्यक्षांसह दोघांविरुद्ध गुन्हा
dombivli school boy died
डोंबिवलीत टेम्पोच्या धडकेत शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू, एक विद्यार्थी गंभीर जखमी
Rumours of bombs due to science experiments police got confuse
विज्ञानाचा प्रयोग, बॉम्बची अफवा अन् पोलिसांची तारांबळ, काय घडले नेमके?
Terrorism started by gangs in Pune crime news Pune news
निवडणुकीच्या तोंडावर शहरात टोळक्याकडून दहशतीचे प्रकार – वारजे, पर्वती, चंदननगर पाेलीस ठाण्यात गुन्हे दाखल
40 students beaten up in municipal school in Sangli news
सांगलीत महापालिका शाळेत तब्बल ४० विद्यार्थ्यांना मारहाण, शिक्षिका निलंबित
Hilarious School Days Video: students were dancing when teacher looked back watch what happen
याला म्हणतात शिक्षकांचा दरारा! बेधुंद होऊन नाचत होते विद्यार्थी, सरांनी मागे वळून पाहताच… Video एकदा पाहाच

पीडितेने तिच्या तक्रारीत नमूद केले आहे की ती कॅम्पसमध्येच असलेल्या तिच्या वसतिगृहातून मध्यरात्री १.३० च्या सुमारास बाहेर पडली होती. ती गांधी स्मारक वसतिगृह क्रॉसिंगवरून जात असताना तिला त्याच संस्थेतील एक विद्यार्थी (तिचा मित्र) भेटला. ते दोघे करमनबीर बाबा मंदिरात पोहोचले तेव्हा बाईकवरून आलेल्या तीन चोरट्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. तिने पुढे असा आरोप केला आहे की तिला तिच्या मित्रापासून वेगळे केल्यानंतर, या तिघांनी तिला एका निर्जन ठिकाणी नेले व तिचे जबरदस्तीने चुंबन घेतले. इतकंच नाही तर तिला विवस्त्र करून या तिघांनी तिचा व्हिडीओ व फोटो काढला. १५ मिनिटांहून अधिक वेळ हा प्रकार चालू होता आणि त्यानंतर तिन्ही चोरटे घटनास्थळावरून पळून गेले.

तिने सांगितले की सदर प्रकार घडल्यावर तिने प्राध्यापकांच्या निवासस्थानाच्या जवळच्या कंपाऊंडमध्ये आश्रय घेतला. नंतर ही बाब संस्थेच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना कळवण्यात आली.

दरम्यान, एफआयआर दाखल करून आणि आयआयटी-बीएचयू प्रशासनाने विद्यार्थ्यांना त्यांच्या मागण्यांकडे लक्ष देण्याचे आश्वासन देऊनही, गुरुवारी संध्याकाळपर्यंत आंदोलन सुरूच ठेवले. आंदोलनकर्त्यांनी संस्थेच्या संचालकांना निषेधाच्या ठिकाणी बोलावण्याची मागणी यावेळी लावून धरली होती.
कॅम्पसमध्ये अशा घटना याआधीही अनेकदा घडल्या आहेत, मात्र विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने पुरेशी कारवाई केली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. तर, “आरोपींना पकडण्यासाठी तीन पथके तयार करण्यात आली असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी वरिष्ठ अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. अधिकारी सीसीटीव्ही फुटेज तपासत असून यात सहभागी झालेल्या चोरट्यांची ओळख पटली आहे” अशी माहिती पोलिसांनी दिली