एपी, नुसा दुआ (इंडोनेशिया) : जगातील विकसित राष्ट्रांचे प्रमुख ‘जी-२० गटा’च्या शिखर परिषदेत मंगळवारी रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाचा तीव्र निषेध करण्यास अनुकूल दिसले. गेले नऊ महिने सुरू असलेल्या रशिया-युक्रेन संघर्षांत युक्रेन उद्ध्वस्त झाला आहे. त्यामुळे या प्रश्नावर रशियावर दबाव आणावा, यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि युक्रेनचे अध्यक्ष व्लोदोमिर झेलेन्स्की यांनी जी-२० राष्ट्रगटात आग्रही भूमिका घेतली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
जी-२० गटाच्या शिखर परिषदेच्या जाहीरनामा मसुद्यासाठी झालेल्या राष्ट्रप्रमुखांच्या विचारविनिमयात संयुक्त राष्ट्रांनी रशियाच्या युक्रेनवरील युद्धाचा केलेल्या निषेधाचे प्रतिबिंब उमटले. मात्र, यापैकी काही सदस्यराष्ट्रांचे भिन्न मत असल्याचीही कबुली यात दिली गेली आहे. या मसुद्याचे काळजीपूर्वक शब्दांकन करण्यात आले. त्यात या शिखर परिषदेतील तणाव प्रतिबिंबित होतो. या शिखर परिषदेत रशिया व चीनच्या नेत्यांचा समावेश असल्याने हा तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे अमेरिका व त्याच्या मित्र राष्ट्रांसमोर रशियाला पर्यायाने रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना एकाकी पाडण्याचे आव्हान आहे. मात्र, या दोन मोठय़ा शक्तींमधील वैमनस्यात अडकू नये, यासाठी काही राष्ट्रांचे प्रयत्न सुरू आहेत.
या मसुद्यात रशियन आक्रमणाचा तीव्र शब्दांत निषेध असून, युक्रेनच्या भूभागातून संपूर्ण व बिनशर्त माघार घेण्याची मागणी असल्याचे वृत्त ‘असोसिएटेड प्रेस’ वृत्तसंस्थेने दिले आहे. मात्र, या मसुद्यात ‘जी-२०’ हे सुरक्षेचे प्रश्न सोडवण्याचे व्यासपीठ नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. काही राष्ट्रांची रशियासंदर्भातील परस्परसंबंधाचे संदर्भ वेगवेगळे आहेत. त्यामुळे रशियावरील सरसकट निर्बंधांबाबत मतभिन्नता असल्याचेही या निवेदनातील मसुद्यात नमूद केले आहे.
या शिखर परिषदेत झेलेन्स्की दूरदृश्य प्रणालीद्वारे युक्रेनची राजधानी कीव्ह येथून सहभागी झाले. त्यांनी बायडेन यांच्या सुरात सूर मिसळून ‘जी-२०’ शिखर परिषदेच्या व्यासपीठाचे निमित्त साधून रशियाला राजकीय व आर्थिक स्तरावर आणखी एकाकी पाडण्यासाठी सदस्य राष्ट्रांना राजी करण्याचा प्रयत्न केला. या राष्ट्रांचे आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी त्यांनी घेतलेली सावध भूमिका ठाऊक असूनही अमेरिका-युक्रेनकडून हे प्रयत्न सुरू आहेत. युक्रेन-रशिया युद्धामुळे चलनवाढ व अर्थव्यवस्था मंदावल्याने या विकसित राष्ट्रांनी रशियाला जबाबदार धरत रशियावर निर्बंध लादण्याची आग्रही भूमिका घेतली आहे.
‘जगाची विकासात्मक वाटचाल अत्यंत खडतर’
इंधन-ऊर्जा व अन्नधान्यावरील वाढत्या खर्चामुळे जगभरातील व्यावसायिक चलनवलन अस्थिर झाले आहे. अर्थव्यवस्थांवर परिणाम झाला आहे. कारण बहुसंख्य युरोपियन देश रशियाकडून नैसर्गिक वायू आयात न करता आगामी हिवाळय़ाला तोंड देण्यास सज्ज झाले आहेत. या शिखर परिषदेचे उद्घाटन करताना, यजमान इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विडोडो यांनी आपल्या संबोधनात जागतिक स्तरावर कशाचा धोका आहे, हे अधोरेखित केले. हे युद्ध संपले नाही तर जगाची विकासात्मक वाटचाल अत्यंत खडतर होईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. कीव्हमधून दूरदृश्यप्रणालीद्वारे बोलताना झेलेन्स्की यांनी फेब्रुवारीपासून रशियाशी सुरू झालेल्या संघर्षांत दहा अटींचा पुनरुच्चार केला. यात रशियन सैन्याची युक्रेनमधून संपूर्ण माघार व युक्रेनच्या संपूर्ण भागावर पुन्हा युक्रेनचे नियंत्रण या दोन प्रमुख अटींचा समावेश आहे.
मोदी-बायडेन भेटीत भारत-अमेरिका संबंधांचा आढावा; प्रगत तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आदी क्षेत्रांतील सहकार्यासह युक्रेन संघर्षांवरही चर्चा
येथे सुरू असलेल्या ‘जी-२०’ शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांची मंगळवारी भेट झाली. यावेळी दोन्ही नेत्यांनी नवनवीन प्रगत व क्लिष्ट तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आदी क्षेत्रांसह भारत-अमेरिकेच्या व्यूहात्मक संबंधांचा आढावा आपल्या चर्चेदरम्यान घेतला. जी-२० शिखर परिषदेदरम्यान उभय नेत्यांच्या झालेल्या या बैठकीत मोदी आणि बायडेन यांनी युक्रेन संघर्ष व त्याच्या परिणामांवरही चर्चा केल्याचे समजते.
परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे, की दोन्ही नेत्यांनी जागतिक प्रादेशिक घडामोडींवर चर्चा केल्याचे सांगितले. दोन्ही नेत्यांनी यावेळी भारत-अमेरिकेतील व्यूहात्मक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी विचारविनिमय केला. यामध्ये प्रगत संगणक, कृत्रिम बुद्धिमत्ता आदी क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यावर उभय पक्षांत सहमती झाली. पंतप्रधान मोदींनी भारत-अमेरिका भागीदारी मजबूत करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी सातत्याने दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार मानले. भारताच्या जी-२० गटाच्या आगामी अध्यक्षपदाच्या काळात दोन्ही देशांमध्ये घनिष्ठ समन्वय राखला जाईल, असा विश्वास मोदींनी यावेळी व्यक्त केला. दोन्ही नेत्यांनी ‘क्वाड’ आणि भारत, इस्रायल, संयुक्त अरब अमिरात आणि अमेरिकेच्या ‘आय२यू२’ सारख्या नवीन राष्ट्रगटांतील भारत व अमेरिकेतील घनिष्ठ सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले.
‘व्हाईट हाऊस’च्या निवेदनानुसार बायडेन यांनी मंगळवारी बाली येथे भारताचे पंतप्रधान मोदी व इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विडोडो यांची भेट घेतली आणि आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्यासाठी प्रमुख मंच म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘जी-२०’ गटासाठीच्या सामायिक कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला. महत्त्वपूर्ण जागतिक आव्हानांचा सामना करून, आपल्या अर्थव्यवस्थांमध्ये शाश्वत व सर्वसमावेशक वृद्धी करण्यासाठी ‘जी-२०’ गट प्रयत्नशील आहे. सध्याच्या हवामान, ऊर्जा आणि अन्न संकटांना तोंड देण्यासाठी, जागतिक आरोग्य संरचना मजबूत करण्यासाठी प्रमुख अर्थव्यवस्थांद्वारे एकत्र प्रयत्न करण्याची क्षमता या गटाची आहे. तंत्रज्ञानाच्या देवाणघेवाणीस चालना देण्यासाठी या राष्ट्रगटाचा उपयोग होतो. बायडेन यांनी इंडोनेशियाच्या ‘जी-२०’ अध्यक्षपद आणि यजमानपदासाठी इंडोनेशियाच्या अध्यक्षांची प्रशंसा केली. पुढील वर्षी भारताच्या अध्यक्षतेखालील ‘जी-२०’च्या वाटचालीस पाठिंबा देण्यास बायडेन उत्सुक असल्याचे सांगण्यात आले.