अमेरिकेतील टेक्सास प्रांतातील सायप्रेसमधील लोन स्टार कम्युनिटी कॉलेजच्या आवारात एका २१ वर्षीय माथेफिरू विद्यार्थ्यांने बुधवारी दोन-तीन इमारतींमध्ये हल्ला चढवित किमान १४ जणांना भोसकले. पोलिसांनी वेगाने कारवाई करीत या तरुणाला अटक केली आहे. या हल्ल्याचे कारण आणि त्याने वापरलेल्या शस्त्राचा तपशील मात्र उघड झालेला नाही.अमेरिकेत आजवर महाविद्यालय व शाळेत बेधुंद गोळीबाराच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर शस्त्रविक्री परवान्याबाबतचे नियम कठोर करण्याबाबतची चर्चाही जोरात सुरू आहे. या पाश्र्वभूमीवर बुधवारी हा हल्ला झाला आहे.
जखमींपैकी चारजणांना हेलिकॉप्टरद्वारे रुग्णालयात न्यावे लागले आहे तर अन्य जखमींना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले आहे. या माथेफिरू तरुणाच्या हल्ल्याची खबर समजतात महाविद्यालयातील अन्य विद्यार्थ्यांनीही त्याला पकडण्यासाठी पोलिसांना मोलाची मदत केली.
टेक्सासमध्ये १४ जणांना भोसकणाऱ्या विद्यार्थ्यांस अटक
अमेरिकेतील टेक्सास प्रांतातील सायप्रेसमधील लोन स्टार कम्युनिटी कॉलेजच्या आवारात एका २१ वर्षीय माथेफिरू विद्यार्थ्यांने बुधवारी दोन-तीन इमारतींमध्ये हल्ला चढवित किमान १४ जणांना भोसकले. पोलिसांनी वेगाने कारवाई करीत या तरुणाला अटक केली आहे.
First published on: 11-04-2013 at 05:10 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Student arrested of texas who attacked on 14 person