अमेरिकेतील टेक्सास प्रांतातील सायप्रेसमधील लोन स्टार कम्युनिटी कॉलेजच्या आवारात एका २१ वर्षीय माथेफिरू विद्यार्थ्यांने बुधवारी दोन-तीन इमारतींमध्ये हल्ला चढवित किमान १४ जणांना भोसकले. पोलिसांनी वेगाने कारवाई करीत या तरुणाला अटक केली आहे. या हल्ल्याचे कारण आणि त्याने वापरलेल्या शस्त्राचा तपशील मात्र उघड झालेला नाही.अमेरिकेत आजवर महाविद्यालय व शाळेत बेधुंद गोळीबाराच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर शस्त्रविक्री परवान्याबाबतचे नियम कठोर करण्याबाबतची चर्चाही जोरात सुरू आहे. या पाश्र्वभूमीवर बुधवारी हा हल्ला झाला आहे.
जखमींपैकी चारजणांना हेलिकॉप्टरद्वारे रुग्णालयात न्यावे लागले आहे तर अन्य जखमींना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले आहे. या माथेफिरू तरुणाच्या हल्ल्याची खबर समजतात महाविद्यालयातील अन्य विद्यार्थ्यांनीही त्याला पकडण्यासाठी पोलिसांना मोलाची मदत केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा