मध्य प्रदेशमधील श्योपूर जिल्ह्यातील एका २४ वर्षीय तरुणाने तोंडात फटाका फोडून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी सांगितलं की, या मृत तरुणाचं नाव ब्रजेश प्रजापती असं आहे. शिक्षणासाठी ब्रजेशला मोठ्या शहरात जायची इच्छा होती. परंतु त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्यामुळे त्याला दुसऱ्या शहरात जाणं शक्य नव्हतं. तसेच त्याच्या कुटुंबियांना त्याला दुसऱ्या शहरात शिक्षणासाठी, राहण्यासाठी पाठवणं आर्थिकदृष्ट्या परवडणारं नव्हतं. पोलिसांनी सांगितलं की, गेल्या अनेक दिवसांपासून ब्रजेश तणावात होता. त्यामुळेच त्याने हे टोकाचं पाऊल उचललं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी सांगितलं की, ब्रजेश सकाळी ९ वाजता शौचालयात गेला. तिथे त्याने सुतळी बॉम्ब (मोठा फटाका) तोंडात पकडून वात पेटवली. काही क्षणात बॉम्ब फुटून ब्रजेश जबर जखमी झाला. दुसऱ्या बाजूला फटाक्याचा आवाज ऐकून ब्रजेशच्या कुटुंबातील सदस्य शौचालयाकडे धावले. त्यांनी जखमी ब्रजेशला रुग्णलयात नेलं. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

हे ही वाचा >> “आता स्फोट होऊ शकतो”, उद्धव ठाकरेंच्या नरेंद्र मोदींवरील ‘त्या’ टीकेनंतर भाजपा संतप्त, बावनकुळे म्हणाले, “असंतोष भडकणार”

दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. ब्रजेशचा मोठा भाऊ हृदयेशने सांगितलं की, ब्रजेश अभ्यासात उत्तम होता. तो जवळच्याच महाविद्यालयात बीएससीची तयारी करत होता. त्याला शिक्षणासाठी मोठ्या शहरात जायचं होतं. परंतु घरची परिस्थिती फार बरी नाही. त्यामुळे त्याला दुसऱ्या शहरात पाठवता आलं नाही.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Student commits suicide bursting firecracker in mouth in bhopal madhya pradesh asc
Show comments