आयआयटी खरगपूरच्या एरोस्पेस इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याचा मृतदेह वसतिगृहामध्ये सिलिंगला लटकलेल्या अवस्थेत आढळला. ‘मला झोपू द्या’ अशी चिठ्ठी त्याने लिहून ठेवली होती. त्यावरुन त्याने आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. निधीन एन. असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याच्या खोलीतच त्याने आत्महत्या केली.  आयआयटी खरगपूरमध्ये झालेली  ही या वर्षातील तिसरी आत्महत्या आहे. निधीनचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. निधीन रोज मध्यरात्री २ वाजता उठून अभ्यास करायचा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभ्यासाला उठण्यासाठी तो अलार्म लावून ठेवत असे. बराच वेळ होऊन देखील अलार्म बंद झाला नाही. त्यावरुन काहीतरी गडबड आहे असा अंदाज आला, असे त्याच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी म्हटले. त्यांनी दरवाजावर थाप मारली परंतु त्याने काही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर आम्ही वसतिगृह प्रशासनाला याबाबत कळवले. काही विद्यार्थ्यांनी खिडकीतून डोकावून पाहले असता निधीनचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत होता. त्यानंतर पोलिसांना बोलविण्यात आले. पोलिसांनी दरवाजा तोडला आणि त्याचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. या घटनेबाबत बोलण्यास आयआयटी प्रशासनाने नकार दिला आहे. १६ जानेवारी रोजी लोकेश मीना या राजस्थान येथून आलेल्या विद्यार्थ्याने रेल्वे खाली आत्महत्या केली होती. मार्च ३० रोजी आंध्रप्रदेशच्या सना श्री राज याने देखील रेल्वे खाली आपला जीव दिला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Student committed suicide in iit kharagpur