दिल्ली विद्यापीठाच्या साऊथ कॅम्पसमध्ये एका विद्यार्थ्याचा निर्घृण खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वर्गातील एका विद्यार्थ्यानेच चाकूने भोसकून ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. खुनाची घटना उघडकीस येताच विद्यापीठ परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं आहे. घटनेची दिल्ली पोलिसांना दिली आहे. पुढील तपास केला जात आहे.

‘एएनआय’ने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्ली विद्यापीठाच्या साऊथ कॅम्पसमध्ये एका विद्यार्थ्याची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे. आरोपी आणि मृत तरुण हे कॉलेजमध्ये आपापल्या क्लासेससाठी आले होते. यावेळी दोघांमध्ये भांडण झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. आरोपीची ओळख पटली असून त्याचा शोध सुरू आहे. विद्यार्थ्याचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

Natalie Winters Dress Controversy
Natalie Winters Dress Controversy : व्हाईट हाऊस प्रतिनिधीच्या स्वेटरवरून वाद… महिला पत्रकारानं दिलं प्रत्युत्तर; म्हणाली, “माफ करा? द्वेष करणारे…”
Nashik-Gujarat highway Accident
Nashik-Gujarat Highway Accident : नाशिक-गुजरात महामार्गावर भीषण अपघात!…
Maha Kumbh Mela Stampade
Maha Kumbh Mela Stampade : महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीमागे कट? पोलिसांनी सुरू केली १६ मोबाइल क्रमांकांची चौकशी
Bride's Father Calls Off Wedding After Groom Dances
Viral News : नवरदेवाचे स्वत:च्याच लग्नात ‘चोली के पिछे क्या है’ गाण्यावर ठुमके; मुलीच्या वडिलांनी मोडलं लग्न
Image Of Elon Musk
Elon Musk : “वीकेंडला काम करणं म्हणजे…”, रविवारीही काम करण्याच्या वादात आता एलॉन मस्क यांची उडी
Image of Donald Trump And Justin Trudeau
Tariff War : आता कॅनडा आणि मेक्सिकोनेही अमेरिकेवर लादले अतिरिक्त आयात शुल्क
Budget 2025 500 crores for the study of artificial intelligence
कृत्रिम प्रज्ञेच्या अभ्यासासाठी ५०० कोटी
Image Of Sonia Gandhi And Draupadi Murmu
Sonia Gandhi : राष्ट्रपतींविरोधातील टीका भोवणार? सोनिया गांधी यांच्याविरोधात तक्रार, गुन्हा नोंदवण्याची मागणी
Nirmala Sitharaman announces provision of Rs 1 28 lakh crore for education sector in Budget
इस मोड से जाते है… ; शिक्षणासाठी १.२८ लाख कोटी

दिल्ली विद्यापीठाच्या साऊथ कॅम्पसमध्ये घडलेल्या या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. मृत विद्यार्थी नेहमीप्रमाणे कॉलेजमध्ये क्लासेससाठी आला होता. पण संबंधित विद्यार्थ्याबरोबर विपरीत घटना घडली आहे. विद्यार्थ्याचा अशाप्रकारे खून झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Story img Loader