दिल्ली विद्यापीठाच्या साऊथ कॅम्पसमध्ये एका विद्यार्थ्याचा निर्घृण खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वर्गातील एका विद्यार्थ्यानेच चाकूने भोसकून ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. खुनाची घटना उघडकीस येताच विद्यापीठ परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं आहे. घटनेची दिल्ली पोलिसांना दिली आहे. पुढील तपास केला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘एएनआय’ने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्ली विद्यापीठाच्या साऊथ कॅम्पसमध्ये एका विद्यार्थ्याची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे. आरोपी आणि मृत तरुण हे कॉलेजमध्ये आपापल्या क्लासेससाठी आले होते. यावेळी दोघांमध्ये भांडण झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. आरोपीची ओळख पटली असून त्याचा शोध सुरू आहे. विद्यार्थ्याचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

दिल्ली विद्यापीठाच्या साऊथ कॅम्पसमध्ये घडलेल्या या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. मृत विद्यार्थी नेहमीप्रमाणे कॉलेजमध्ये क्लासेससाठी आला होता. पण संबंधित विद्यार्थ्याबरोबर विपरीत घटना घडली आहे. विद्यार्थ्याचा अशाप्रकारे खून झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.