आज भारताचा ७५ वा स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात येत आहे. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे मोठे योगदान होते. आजच्या दिवशी संपूर्ण देश नेताजींचे स्मरण करत आहे. दरम्यान, जर्मनीत राहणाऱ्या नेताजी यांची मुलगी अनिता बोस फाफ यांनी नेताजींच्या अस्थी भारतात आणण्याची विनंती त्यांनी भारत सरकारकडे केली आहे.
नेताजी फाइल्स : एका षड्यंत्र सिद्धान्ताची शोधयात्रा
नेताजींचा अस्थी टोकियोच्या रेन्कोजी मंदिरात जतन
अनिता बोस यांच्या म्हणण्यानुसार, नेताजींचा मृत्यू १८ ऑगस्ट १९४५ रोजी तैवानमध्ये विमान अपघातात झाला आणि त्यांचे अवशेष सप्टेंबर १९४५ पासून टोकियोच्या रेन्कोजी मंदिरात जतन करण्यात आले आहेत. “नेताजींच्या निधनाच्या ७३ व्या वर्धापनदिनानिमित्त त्यांनी भारत सरकारसोबत जपान सरकारलाही नेताजींच्या अस्थी भारतात पाठवण्याची मागणी केली आहे.
अस्थींचा काही भाग गंगा नदीत विसर्जित करावा
“स्वतंत्र भारतात परतण्याची माझ्या वडिलांची महत्त्वाकांक्षा होती. याची दुर्दैवाने पूर्तता झाली नाही. त्यामुळे त्यांच्या अवशेषांना किमान स्वतंत्र भारताच्या मातीला स्पर्श करु द्या. माझे वडील धर्माभिमानी होते. त्यामुळे त्याच्या अस्थींचा काही भाग गंगा नदीत विसर्जित करणे प्रथेनुसार योग्य असल्याचेही अनिता बोस म्हणाल्या.
११५ वर्षीय टोकियोस्थित जपान-इंडिया असोसिएशनचे अध्यक्ष हिरोशी हिराबायाशी यांनीही भारत सरकारला नेताजींचे पार्थिव परत देण्याची विनंती जपान सरकारला केली आहे. भारतातील जपानचे माजी राजदूत हिराबायाशी यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “रेन्कोजी मंदिरात (टोकियो) ठेवलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अस्थी मिळवण्यासाठी भारत सरकार जपान सरकारच्या अधिकृत पुष्टीकरणाची वाट पाहत आहे.
चिंतनधारा : स्वराज्याचा पाया सुराज्याने
अस्थींची डीएनए चाचणी करावी
तैवान येथे विमान अपघातानंतर नेताजींचा मृत्यू कसा झाला आणि त्यांचे अवशेष टोकियोला कसे नेले याचा पुरावा देणारी काही कथित कागदपत्रे अलीकडेच आशिस रे यांच्या पुस्तकात प्रकाशित झाली आहेत. जपानमधील टोकियो येथील एका मंदिरात नेताजींच्या अवशेषांच्या डीएनए चाचणीसाठी त्या तयार आहेत. मंदिरातील पुजारी आणि जपान सरकारलाही या चाचणीला हरकत नसून ते अवशेष सुपूर्द करण्यास तयार असल्याचेही अनिता बोस यांनी सांगितले.