करोनाची आपत्ती ही ‘देवाची करणी’ (Act of God) असून यंदाही अर्थव्यवस्था आकुंचन पावणार आहे, असे सांगत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यांना वस्तू व सेवा कराची (जीएसटी) थेट नुकसानभरपाई देण्यास केंद्र हतबल असल्याचे गुरुवारी जणू कबूल केले. भरपाईपोटी राज्यांना रिझव्र्ह बँकेकडून किफायतशीर व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्याचे दोन पर्याय केंद्राने दिले.मात्र या बैठकीमध्ये निर्मला यांनी ‘देवाची करणी’ म्हणजेच Act of God चा उल्लेख केल्यानंतर हा विषय चांगलाच चर्चेत आला आहे. आता याच मुद्द्यावरुन भाजपाचे खासदार भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्याबरोबर केंद्र सरकारला घरचा आहेर दिला आहे. ट्विटवरुन यासंदर्भात व्यक्त होताना स्वामी यांनी करोनापूर्वी अर्थव्यवस्थेला जी घरघर लागली ती पण देवाचीच करणी होती का असा प्रश्न उपस्थित केला आहे.
२०१५ पासून GDP घसरतोय, ही सुद्धा ‘देवाची करणी’ का?; भाजपा खासदाराकडून सरकारला घरचा आहेर
भाजपा खासदारानेच निर्मला सितारामन यांच्या वक्त्यवावरुन उपस्थित केला प्रश्न
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 28-08-2020 at 17:52 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Subramanian swamy slams central government and fm n sitharaman over act of god comment scsg