Suchana Seth Planned 4 Year Old Son Murder: चार वर्षाच्या मुलाची हत्या करण्याच्या आरोपाखाली पोलिस कोठडीत असणाऱ्या सूचना सेठच्या चौकशी व तपासाच्या दरम्यान नवीन माहिती समोर आली आहे. इंडियन एक्ससप्रेसच्या माहितीनुसार, मुलाची हत्या करण्याच्या एका आठवड्याआधी सुद्धा एकदा सूचना गोव्याला गेली होती. एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये सूचना राहिली होती जिथे तिचा मुलगा सुद्धा तिच्याबरोबर होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सूचनाच्या सततच्या गोवा ट्रिप

पोलिसांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी रविवारी सूचना गोव्याला आली होती व चार जानेवारीला ती बंगळुरूला परतली होती. त्यानंतर दोनच दिवसात तिने अचानक गोव्याला पुन्हा जाण्याचा प्लॅन केला आणि ६ जानेवारीला ती पुन्हा गोव्यात पोहोचली.उत्तर गोव्यातील कँडोलिम बीच येथील हॉटेल सोल बनयान ग्रांडे एक खोली बूक करून इथेच सूचनाने आपल्या मुलाची हत्या केली, असे समजतेय.

इंडियन एक्सस्प्रेसने पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपी सुचना सेठ हिला कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यातून तिच्या मुलाचा मृतदेह पिशवीत भरून टॅक्सीमधून पळून जाण्याचा प्रयत्न करताना पकडण्यात आले होते.एका अधिकाऱ्याने सांगितले की, हाऊस-कीपिंग कर्मचार्‍यांपैकी एक जण सोमवारी अपार्टमेंट स्वच्छ करण्यासाठी गेला असताना त्याला काही रक्ताचे डाग दिसले. हॉटेल व्यवस्थापनाने गोवा पोलिसांशी संपर्क साधला आणि कलंगुट पोलिस ठाण्याचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले.

जेव्हा गोवा पोलिसांनी कॅब चालकाशी संपर्क साधला आणि आरोपीशी फोनवर बोलून तिच्या मुलाची चौकशी केली. तेव्हा कॉलवर तिने दावा केला की तिचा मुलगा गोव्यातील फातोर्डा येथे मित्रांबरोबर होता. तिची उत्तरे अस्पष्ट आणि संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी चालकाला कॅब कर्नाटकातील जवळच्या पोलीस ठाण्यात नेण्यास सांगितले. चित्रदुर्गातील पोलिस स्टेशनमध्ये, कर्नाटक पोलिसांना मुलाचा मृतदेह तिच्या पिशवीत सापडला त्यावेळी तिला ताब्यात घेण्यात आले.

३१ डिसेंबरला काय घडलं?

पोलिसांच्या चौकशीत सूचनाने आपल्या पतीसह बिघडलेल्या नात्याविषयी भाष्य केले होते. तसेच सूचना व व्यंकट रमण (पती) यांची जेव्हा पोलिस स्टेशनमध्ये भेट झाली तेव्हाही त्यांच्यात संतप्त शाब्दिक देवाणघेवाण झाली होती, यावरून वैवहिक कलहांमुळे सूचनाने असे पाऊल उचलले असावे असा अंदाज आणखीनच गडद होतो.शिवाय व्यंकट यांचे वकील अझहर मीर यांनी सांगितले की.कौटुंबिक न्यायालयाने मागील एका वर्षापासून अनेक निर्णय हे व्यंकट यांच्या बाजूनेच दिले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “३१ डिसेंबरला गोव्यात असताना सूचनाचे तिच्या पतीसह बोलणे झाले होते. मुलगा आजारी असल्याने त्याला भेटायला पाठवू शकत नाही असे सूचनाने नवऱ्याला सांगितले होते. सतत गोव्याला जाण्यावरून हे लक्षात येते की कोर्टाच्या म्हणण्यानुसार नवऱ्याला मुलाला भेटता येऊ नये अशीच सूचनाची इच्छा होती.

४ वर्षांच्या लेकाच्या हत्येआधी सूचनाने लिहिलेली चिठ्ठी ते नवऱ्याला पोलिसांसमोर दिलेली धमकी, भयानक घटनेचे १५ मुख्य मुद्दे

एफआयआरनुसार, सूचनाने तिच्या मुलासह ४०४ क्रमांकाच्या खोलीत चेक इन केले होते. ६ जानेवारीच्या रात्रीपासून १० जानेवारी पर्यंतचे बूकिंग तिने केले होते.पण ७ जानेवारीलाच तिने हॉटेलच्या स्टाफला आपल्यासाठी कॅब बूक करायला सांगितली होती.तातडीच्या कामासाठी बंगळुरूला जावं लागणार असल्याचं तिने म्हटलं होतं. दरम्यान, सध्या पणजीच्या न्यायलयाने सूचनाच्या पोलिस कोठडीत पाच दिवसांची वाढ केली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suchana seth killed 4 year old son case update from week suchana was going to goa trips 31 st december chats with husband reveled how murder was plan svs
Show comments