हल्लेखोर ठार; आयसिसने जबाबदारी स्वीकारली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बांगलादेशची राजधानी ढाका येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी एका आत्मघातकी बाँबरने स्वत:ला उडवून दिले. इस्लामिक स्टेट (ISIS) या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. येथून जवळच असलेल्या बांगलादेशच्या Rapid Action Battalion रॅपिड अॅक्शन बटालियनच्या शिबिरावर झालेल्या अशाच प्रकारच्या हल्ल्यानंतर आठवडाभराने हा हल्ला झाला आहे.

जीन्स व शर्ट अशा वेशातील बाँबर तिशीतील तरुण असल्याचे सांगण्यात आले. हझरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एका पोलीस चौकीनजिक त्याने स्वत:च्या कंबरेला बांधलेली स्फोटके उडवून दिली. या स्फोटात इतर कुणी इसम जखमी झाला नाही. हल्लेखोराची ओळख लगेच पटू शकलेली नाही. या इसमाने पोलीस चौकीसमोर बाँबचा स्फोट केला व नंतर स्वत:ला उडवून दिले, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने वार्ताहरांना सांगितले.

या हल्लेखोराजवळ आणखी तीन बाँब भरलेली एक ट्रॉली बॅग होती. बाँबनाशक पथकाने नंतर नियंत्रित स्फोटाद्वारे तिचा स्फोट घडवून आणला असता एका पोलिसासह पाच जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या हल्लेखोराचा उद्देश पोलीस चौकीवर हल्ला करण्याचा होता, मात्र विमानतळावरील कडक बंदोबस्तामुळे त्याला त्यापूर्वीच आत्महत्या करणे भाग पडले, असे ढाक्याचे पोलीस आयुक्त असदुझ्झमान मिया यांनी पत्रकारांना सांगितले. बीडीन्यूज२४ डॉट कॉम च्या वृत्तानुसार, बहुधा विमानतळाच्या प्रवेशद्वाराजवळील सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्यासाठी हल्लेखोराने त्याच्याजवळील बाँबचा स्फोट केला.

या घटनेच्या काही तासांनंतर आयसिसने त्यांचा प्रचार करणाऱ्या ‘अमाक’ या वृत्तसंस्थेवर या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. ढाका शहरातील आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील बांगलादेश पोलिसांचा एक तपासणी नाका हे हल्ल्याचे लक्ष्य असल्याचे त्यांनी सांगितले. बांगलादेशने मात्र देशात कुठल्याही विदेशी दहशतवादी गटाचे अस्तित्व नसल्याचे सांगून यापूर्वी आयसिसचे दावे फेटाळून लावले आहेत.

येथून जवळच असलेल्या बांगलादेशच्या रॅपिड अॅक्शन बटालियनच्या (आरएबी) शिबिरावर १७ मार्च रोजी अशाच प्रकारचा हल्ला झाला होता. त्याच्या दुसऱ्या दिवशी खिलगाव येथील आरएबीच्या तपासणी नाक्यावर एका संशयित आत्मघातकी हल्लेखोराला गोळ्या घालून ठार मारण्यात आले होते. त्यानंतर देशभरातील विमानतळ व तुरुंगांमधील सुरक्षा व्यवस्था आवळण्यात आली आहे.

देशाच्या ईशान्य भागातील सिल्हेट शहरातील दहशतवाद्यांच्या एका छुप्या अड्डय़ावर हल्ला करण्यासाठी लष्कराच्या कमांडोंना पाचारण करण्यात आल्याच्या दिवशीच विमानतळानजिक हा हल्ला करण्यात आला. पोलिसांच्या कमांडो युनिट्सनी सिल्हेटमधील एका पाच मजली इमारतीला गुरुवारपासून वेढा दिला आहे.

दहशतवाद्यांच्या अड्डय़ावर बांगलादेशच्या कमांडोंचा हल्ला

ढाका : बांगलादेशच्या ईशान्येकडील सिलहेत येथे एका पाचमजली इमारतीमध्ये दडून बसलेल्या दहशतवाद्यांना हुसकावून लावण्यासाठी जवळपास ३० तास  केलेले शर्थीचे प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर लष्कराच्या कमांडोंनी आयसिसचे दहशतवादी दडून बसलेल्या अड्डय़ावर आक्रमण केले. सदर इमारतीमध्ये दडून बसलेल्या दहशतवाद्यांसमवेत चकमक झाल्यानंतर लष्कराचे कमांडो, स्वात युनिट, दहशतवाद प्रतिबंधक विभाग आणि शीघ्र कृती बटालियनने ‘ऑपरेशन ट्विलाइट’ कारवाई केली. लष्कराने पूर्ण सज्जतेने केलेल्या कारवाईपूर्वी ७ जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. दहशतवाद्यांनी कब्जा केलेल्या इमारतीमध्ये अद्याप अनेक नागरिक अडकून पडले आहेत. जेएमबीचा म्होरक्या मुसा हा अन्य दहशतवाद्यांसह सिलहेतमध्ये असल्याची माहितीही मिळाली आहे. दहशतवादी इमारतीच्या तळमजल्यावर आहेत अशी प्रथम माहिती होती, मात्र त्यांनी या इमारतीमधील तीन फ्लॅटचा ताबा घेतला आहे.