पाकिस्तानातील लष्कराचा बालेकिल्ला असलेले शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रावळपिंडी शहरात सोमवारी तालिबान्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात सहा सैनिकांसह १३ जण ठार झाले तर इतर २४ जण जखमी झाले. रविवारी बानू जिल्ह्य़ातील छावणी भागात झालेल्या आत्मघाती बॉम्बहल्ल्यात २० सैनिक ठार झाल्यानंतर आज लागोपाठ  दुसरी घटना घडली आहे. आत्मघाती बॉम्बर सायकलवर आला व त्याने बाजारपेठ भागात एका लष्करी जवानास मागे सारून तो लष्कराच्या मुख्यालयात घुसला, इतर लष्करी आस्थापनांमध्येही तो गेला. नंतर त्याने स्फोटात स्वत:ला उडवून दिले. लष्करी मुख्यालयापासून चालत जाण्याच्या अंतरावर बाजारपेठ आहे व तो शहरातील सर्वात सुरक्षित भाग मानला जातो असे पोलिस प्रमुख अख्तर हयात लालिका यांनी सांगितले.

Story img Loader