बुधवारी चीनचे शिष्टमंडळ आणि अफगाणिस्तान परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक होणार होती. मात्र, त्यापूर्वी परराष्ट्र मंत्रालयाजवळ आत्मघातकी बॉम्बहल्ला झाल्याची घटना घडली आहे. या बॉम्बस्फोटात पाच जणांना मृत्यू झाला असून २० जण जखमी झाल्याची माहिती तालिबान सरकारच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच हा व्यक्ती परराष्ट्र मंत्रालयात घुसण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, त्यात त्याला अपयश आले, असेही ते म्हणाले. एनडीटीव्हीने याबाबतचे वृत्त दिले आहे.
हेही वाचा – अमेरिकेतील हवाई सेवेचा खोळंबा; देशाच्या विमान वाहतूक यंत्रणेत मोठा बिघाड; अनेक उड्डाणे रद्द
काबूल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी चीनचे शिष्टमंडळ आणि अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक होणार होती. मात्र, त्यापूर्वीच दुपारच्या सुमारास एक व्यक्ती बॅग आणि रायफल घेऊन परराष्ट्र मंत्र्यालयाजवळ पोहचली आणि काही मिनिटांतच मोठा स्फोट झाला. या घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले आहेत. तसेच या घटनेनंतर सुरक्षा रक्षकांनी तत्काळ जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले, अशी माहिती काबूल पोलिसांकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा – तांत्रिक बिघाडाचा मोठा फटका! अमेरिकेत तब्बल ५४०० विमानांचे उशिराने उड्डाण!
दरम्यान, हा हल्लाची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने घेतली असून या हल्ल्यामागे इस्लामिक स्टेट असल्याचा आरोप तालिबानकडून करण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे मागील काही महिन्यात इस्लामिक स्टेटकडून अफगाणिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात बॉम्बहल्ले करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी आयएसने काबुलमधील एका मशिदीवरही हल्ला केला होता. या हल्ल्यात चार जणांनाचा मृत्यू तर २५ जण जखमी झाले होते. तसेच गेल्या महिन्यात काबूलमधील चिनी व्यावसायिकाच्या हॉटेलवर गोळीबार करण्यात आला होता. यात पाच चिनी नागरिक जखमी झाले होते. या हल्ल्याची जबाबदारी आयएसने घेतली होती.