पीटीआय, इस्लामाबाद

पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील रेल्वे स्थानकावर शनिवारी झालेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटात १४ सुरक्षा कर्मचाऱ्यांसह किमान २७ लोक ठार आणि ६२ जण जखमी झाले. पेशावरसाठी निघालेली जाफर एक्स्प्रेस पकडण्यासाठी प्रवासी प्रांतीय राजधानी असलेल्या क्वेटाच्या रेल्वे स्थानकात जमले होते, त्या वेळीच हा बॉम्बस्फोट झाला.

BJP Party Worker Dead Body Found in Office
BJP Worker : भाजपा कार्यकर्त्याचा रक्ताने माखलेला मृतदेह कार्यालयात सापडल्याने खळबळ, महिला अटकेत; कुठे घडली घटना?
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Advice from Uttar Pradesh State Commission for Women to male tailors
‘पुरुष शिंप्यांनी महिलांचे माप घेऊ नये’ ; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाचा सल्ला
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
stray puppies burnt alive
तीन दिवसांपूर्वी जन्मलेल्या कुत्र्याच्या ५ पिलांवर पेट्रोल टाकून जाळलं; झोप मोड होते म्हणून २ महिलांचं क्रूर कृत्य
Hyderabad Airport Bomb Threat
‘बॉम्ब’चा टोमणा मुलीला महागात पाडला, विमानतळावर उडाली खळबळ; मेटल डिटेक्टरच्या आवाजामुळे गोंधळात भर
saudi arabia snowfall
सौदी अरेबियाच्या रखरखीत वाळवंटात झाली चक्क बर्फवृष्टी; कारण काय?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?

हल्लेखोर आत्मघातकी हल्ला करण्याच्या उद्देशाने स्थानकात घुसले. त्यांना रोखणे कठीण होते, असे क्वेटा विभागाचे आयुक्त हमजा शफकत यांनी सांगितले. दरम्यान, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याची माहिती या वेळी पोलीस अधीक्षक (मोहीम) मुहम्मद बलोच यांनी दिली आहे. परिसराची सुरक्षा वाढवली असून जखमी आणि मृतांना सरकारी रुग्णालयात दाखल केल्याचे प्रांतीय सरकारचे प्रवक्ते शाहीद रिंद यांनी सांगितले.

हेही वाचा >>>‘बॉम्ब’चा टोमणा मुलीला महागात पाडला, विमानतळावर उडाली खळबळ; मेटल डिटेक्टरच्या आवाजामुळे गोंधळात भर

बीएलए’ने घेतली हल्ल्याची जबाबदारी

बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए) या बलूच फुटीरतावादी गटाला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आले आहे. या संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. पाकिस्तान सरकार बलुचिस्तानच्या संसाधनांचा वापर करून या भागाच्या विकासाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप बीएलएने केला आहे.