तब्बल १०० हून अधिक लोकांची कोट्यवधी रुपयांना आर्थिक फसवणूक करणारा ठग सुकेश चंद्रशेखर सध्या तिहार तुरुंगात शिक्षा भोगतोय.त्याने तुरुंगातून अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला पत्र लिहिलं आहे. त्याने या पत्रात त्याच्या प्रेमकथेविषयी लिहिलं असून त्यांच्या प्रेमकथेची तुलना त्याने रामायणाशी केली आहे. फ्री प्रेस जर्नलने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

सुकेश चंद्रशेखरने पत्रात लिहिलंय की, “जसा प्रभू राम सीतेसह वनवासातून परतला होता, तसाच मीही माझ्या सीतेसाठी, जॅकलिनसाठी या छोट्या वनवासातून परतणार आहे. “आमच्यात काय आहे हे जगाला काय माहीत… वेडे लोक तेच आहेत ज्यांनी आज जगाचा मार्ग बदलला आहे. काल, आज आणि उद्या आमची प्रेमकहाणी एक आदर्श ठरणार आहे आणि आमच्यासारख्या वेड्यांना जग कायम स्मरणात ठेवेल.”

saara kahi tichyasathi fame actor abhishek gaonkar will get marriage in November
पृथ्वीक प्रतापनंतर ‘हा’ लोकप्रिय मराठी अभिनेता लवकरच चढणार बोहल्यावर, लग्नाची तारीख विचारताच म्हणाला…
Daily Horoscope On 30 October
३० ऑक्टोबर पंचांग: दिवाळीआधीच येईल सोनेरी संधी, आर्थिक…
Mahavikas aghadi Seat Sharing Formula
MVA Seat Sharing : मविआचं ठरलं! कोणी मोठा व लहान भाऊ नाही, सर्वांनाच सम-समान जागा
Priyanka Gandhi
Priyanka Gandhi : ‘मी ३५ वर्षे दुसऱ्यांसाठी मतं मागितली, पण पहिल्यांदाच स्वत:साठी…’, प्रियंका गांधींचं वायनाडकरांना भावनिक आवाहन
Supriya sule and ajit pawar
Supriya Sule : “मला जे अजितदादा आठवतात त्यांना दिल्लीला जाणं आवडत नाही, कारण…”; सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
dy chandrachud Write Letter to Center
CJI Chandrachud : “सरन्यायाधीशपदी संजीव खन्ना यांची निवड करा”, डी. वाय. चंद्रचूड यांनी केली पत्र लिहून केली शिफारस
sanjay raut
“वंदे मातरमला विरोध करणाऱ्या व्यक्तीला आमदार केलं,आता हिंदुत्त्वाचा गब्बर…”; इद्रीस नायकवाडींच्या शपथविधीवरून संजय राऊतांचं टीकास्र!
Ramdas athawale Assembly Elections 2024 ministership
आपटीबार: आठवले, विसरू नका!

हेही वाचा >> “तू आयुष्यात आल्याने…”; २०० कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी सुकेश चंद्रशेखरचे जॅकलीन फर्नांडिसला आणखी एक पत्र

गिफ्ट देण्याचा कालावधी वाढवला

i

सुकेशने त्याच्या मागील पत्रात जॅकलीनच्या २०० चाहत्यांना महिंद्रा थार रॉक्स कार आणि आयफोन १६ प्रो फोन भेट देण्याचे आश्वासन दिले होते. हे गिफ्ट मिळण्याची अंतिम मुदत २५ डिसेंबर २०२४ पर्यंत वाढवण्यात आल्याचंही त्याने पत्रात नमुद केलंय. सुकेशने पत्राच्या शेवटी जॅकलिनचा ‘राम’ असं लिहिलं असून वचन दिलं की तो राम आणि सीताप्रमाणेच भव्यदिव्य रुपात परतेल.

दरम्यान, सुकेशने जॅकलीनला ५२ लाख रुपये किमतीचा घोडा भेट म्हणून दिला होता आणि ९ लाख रुपयांची पर्शियन मांजर गिफ्ट दिली होती. सध्या तो तिहार तुरुंगात आहे. त्याच्यावर २०० कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे. जॅकलीन, नोरा यांच्यासारख्या अनेक अभिनेत्रींना त्याने महागड्या भेटवस्तू देऊन स्वतःच्या जाळ्यात ओढले होते. या दोघींशिवाय सारा अली खान, चाहत खन्ना यांचेही नाव जोडले जाते. सुकेशने फोर्टिस हेल्थकेअरचे माजी प्रमोटर शिविंदर मोहन सिंह यांच्या पत्नी अदिती सिंह यांच्यासह अनेकांची फसवणूक केली आहे.