संत नामदेवांच्या पावन भूमीत मराठी साहित्य संमेलन झाले. पंजाबी साहित्य संमेलन महाराष्ट्रात होणार आहे. असे एकमेकांच्या राज्यामध्ये कार्यक्रम झाले तर, राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागेल. सांस्कृतिक आदानप्रदानासाठी संमेलनांची आवश्यकता असल्याचे मत पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखबीरसिग बादल यांनी रविवारी व्यक्त केले.
बादल म्हणाले, संत नामदेव हा पंजाब आणि महाराष्ट यांना जोडणारा दुवा आहे. ही दोन्ही राज्ये शूरवीरांची भूमी आहेत. देशाच्या स्वातंत्र्यलढय़ामध्ये पंजाबी लोकांनी सर्वाधिक हौतात्म्य पत्करले आहे. त्यामुळे महाराष्ट्राशी आमचे एक वेगळे नाते आहे, असे ते म्हणाले.
साहित्य संमेलन आणि नाटय़संमेलनासाठी राज्य सरकारतर्फे दिले जाणारे अनुदान हे पुढील वर्षीपासून अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या खात्यामध्ये विजया दशमीला जमा केले जाणार असल्याची घोषणा विनोद तावडे यांनी केली.
शहीद भगितसग-राजगुरु-सुखदेव यांच्या वंशजांचा या वेळी सत्कार करण्यात आला. शहीद भगितसग यांचे पुतणे किरणजिितसह म्हणाले, पंजाब आणि महाराष्ट्राची संस्कृती एक आहे. स्वातंत्र्यचळवळीमध्ये लाल-बाल-पाल यांच्यानंतर भगतसिंग-सुखदेव-राजगुरु यांनी बलिदान दिले.
पंजाब आणि महाराष्ट्राचे नाते या संमेलनामुळे घट्ट झाले असल्याची भावना डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केली.
राज्य सरकारने संत नामदेव पुरस्कार सुरू करून हा पुरस्कार महाराष्ट्राबाहेरील साहित्यिकाला प्रदान करावा, अशी सूचना त्यांनी केली. या वेळी जितदर पन्नू, रेहमान राही, संजय नहार, भारत देसडला यांनी मनोगत व्यक्त केले. प्रकाश पायगुडे यांनी ठरावांचे वाचन केले. डॉ. माधवी वैद्य यांनी प्रास्ताविक केले. सुनील महाजन यांनी आभार मानले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा