कर्नाटकातील मागास भागात जननी अम्मा म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुलागिट्टी नरसम्मा यांचे मंगळवारी सायंकाळी निधन झाले. त्या ९८ वर्षांच्या होत्या. कोणत्याही वैद्यकीय मदतीशिवाय सुखरूप बाळंतपण करण्यासाठी त्यांची ओळख होती. सुलागिट्टी नरसम्मा यांनी तब्बल पंधरा हजार महिलांचं सुखरूप बाळंतपण केलं आहे. सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांचा २०१८ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे.

कर्नाटकमधील तुमकूर जिल्ह्यात सुलागिट्टी नरसम्मा यांचा जन्म झाला होता. त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात तब्बल पंधरा हजार महिलांचे बाळंतपण केली. कोणत्याही वैद्यकीय मदतीशिवाय त्या हे काम करायच्या, त्यामुळे कर्नाटकच्या मागास आणि दुर्गम भागात त्यांना जननी अम्मा या नावाने ओळखले जायचे. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून तुमकूर विद्यापीठाने डॉक्टरेट ही मानद पदवी दिली होती. याचबरोबर अनेक संस्थांच्या वतीने त्यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला होता.

सुलागिट्टी नरसम्मा यांच्या निधनानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्यासह राजकीय नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

Story img Loader