भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी गोव्यामध्ये शनिवारी होत आसलेल्या  पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या महत्वाच्या बैठकीला गैरहजर राहण्याचा निर्णय घेतला आहे. आजपर्यंत अडवाणी कधीच राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत गैरहजर राहिले नव्हते.
आजारी असल्यामुळे ते या महत्वाच्या बैठकीला येणार नाहीत, असे भाजपच्या वतीने सांगण्यात आले आहे. शुक्रवारी पारपडलेल्या पदाधिकारयांच्या बैठकीत आजारी असल्यामुळे ते गैरहजर असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले होते.
अडवाणी यांना प्रकृतीच्या कारणावरून आपणच उपस्थित राहू नका, असे सांगितल्याचे पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले होते. अडवाणी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला शनिवारी येतील, असेही राजनाथ सिंह यांनी सांगितले होते.मात्र, पक्षाच्या या बैठकीलाही अडवाणी अनुपस्थित राहणार आहेत.

Story img Loader