मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील दहशतवाद्यांना बोट आणि अन्य उपकरणांची विक्री करणाऱ्या सहा साक्षीदारांवर पाकिस्तानातील दहशतवादविरोधी न्यायालयाने समन्स बजावले आहे.
मुंबईवरील हल्ल्यात सहभाग असल्याचा सात जणांवर आरोप असून न्या. हबीब-ऊर-रेहमान यांनी हमजा बिन तारिक, मोहम्मद अली, मोहम्मद सैफुल्ला, उमर द्राज, साकिब इक्बाल आणि अतिक अहमद यांच्यावर समन्स बजावले आहे. पाकिस्तानच्या न्यायिक आयोगाच्या सदस्यांना मुंबईत चार साक्षीदारांची उलटतपासणी घेऊन त्यांचे जबाब नोंदविण्याची परवानगी अद्याप भारत सरकारने दिलेली नाही. मात्र तरीही या खटल्याची सुनावणी सुरू करण्याची विनंती वकिलांनी न्यायाधीशांना केली. या खटल्याची सुनावणी दररोज घ्यावी, अशी विनंती करणाऱ्या अर्जाचाही विचार करावा, अशी विनंतीही वकिलांनी केली.

Story img Loader