मनुष्यबळ विकास राज्यमंत्री शशी थरूर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांना रशियन विष देऊन मारण्यात आले असल्याचा खुलासा भारतीय जनता पक्षाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे.
सुब्रमण्यम स्वामी आपल्या ट्विटर अकाऊंटवर म्हणतात की, सुनंदा पुष्कर यांना विष देण्यात आल्याचा पुरावा आमच्याकडे आहे. त्यांना विष देण्यासाठी नाक दाबण्यात आले होते. केंद्रातील सरकार बदलल्यानंतर आम्ही यावर सविस्तर चौकशी करू असेही ते म्हणाले. तसेच नरेंद्र मोदींचे सरकार आल्यानंतर आम्ही सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणाबाबत जनहित याचिका दाखल करू घटनेची चौकशी करून खरी माहिती समोर आणू त्याचबरोबर अंत्यसंस्काराबाबत थरूर यांनी एवढी घाई का केली यामागेही काहीतरी गौडबंगाल दडले आहे असेही सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे.
तर, शशी थरुर यांनी सुब्रमण्यम स्वामी यांचे आरोप फेटाळून लावत त्यांना पुरावे सादर करण्याचे आव्हान दिले आहे. तसेच माझ्या पत्नीच्या मृत्यूवरून विरोधकांनी राजकारण करणे खेदजनक असल्याचेही थरूर म्हणाले.

Story img Loader