केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा यांच्या गूढरीत्या झालेल्या मृत्यूबाबत थरूर यांना अनेक प्रश्नांचे समाधानकारक स्पष्टीकरण देणे बंधनकारक असल्याचे मत माकपचे नेते व्ही. एस. अच्युतानंदन यांनी व्यक्त केले आहे.
सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूमुळे जे प्रश्न उद्भवले आहेत त्याचे स्पष्टीकरण थरूर यांना द्यावेच लागेल. थरूर यांच्याशी विवाह झाल्यानंतर तीन वर्षांतच सुनंदा यांचा मृत्यू झाला आहे. सुनंदा यांच्या शरीरावर जखमांच्या खुणा आढळल्याचे डॉक्टर आणि पोलिसांनी सांगितले आहे. त्यामुळे या प्रकरणाला कोण जबाबदार आहे, त्याबाबतचे संशयाचे मळभ थरूर यांना दूर करावेच लागेल, असेही अच्युतानंदन म्हणाले.