दिलेल्या अभिप्रायावर थरूर यांचे जाबजबाब
तिरुवनंतपूरमचे काँग्रेस खासदार शशी थरूर यांचे त्यांच्या पत्नी सुनंदा थरूर यांचा विषबाधेने मृत्यू झाल्याच्या प्रकरणात पुन्हा जाबजबाब घेतले जाणार आहेत. कालही त्यांचे जाबजबाब नोंदवण्यात आले, असे दिल्लीचे पोलीस आयुक्त बी. एस. बस्सी यांनी सांगितले.
सुनंदा थरूर यांच्या मृत्यूचा तपास आम्ही योग्य दिशेने करीत आहोत. विशेष चौकशी पथक चांगले काम करीत आहे, असे सांगून ते म्हणाले, की या प्रकरणातील तपास संथगतीने होण्यास अनेक कारणे आहेत. दरम्यान, थरूर यांचे कालही दक्षिण दिल्लीतील वसंत विहार पोलीस स्टेशनच्या वाहन दरोडा विरोधी पथकाने जाबजबाब घेतले आहेत. एक वर्षांपूर्वी त्यांचे तीनदा जाबजबाब झाले होते. थरूर यांच्याकडून जी स्पष्टीकरणे हवी होती ती मिळाली आहेत. जर विशेष चौकशी पथकाला आणखी माहिती लागली तर थरूर यांना पुन्हा बोलावून जाबजबाब घेतले जातील. आताच्या जाबजबाबात त्यांना एफबीआयने सुनंदा थरूर यांच्या व्हिसेराबाबत दिलेल्या अहवालावर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने सादर केलेल्या अभिप्रायावर प्रश्न विचारण्यात आले. सुनंदा थरूर यांनी अलप्रॅक्स हे औषध घेतले होते व आयोडिकेन हा पदार्थही व्हिसेरात सापडला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा