सुनंदा पुष्कर यांच्या हत्येप्रकरणी गुरुवारी त्यांचा मुलगा शिवमेनन यांचा जबाब दिल्ली पोलीसांच्या विशेष तपास पथकाने नोंदवून घेतला. दिल्लीतील वसंत विहार पोलीस ठाण्यामध्ये मेनन गुरुवारी दुपारी सव्वा वाजण्याच्या सुमारास पोहोचले. त्यानंतर सुमारे दीड तास पोलीसांनी त्यांच्याकडून माहिती घेतली. दिल्लीचे पोलीस आयुक्त बी. एस. बस्सी यांनी बुधवारीच शिवमेनन यांच्याकडून पोलीस माहिती घेतील, असे सांगितले होते. शिवमेनन दुबईतून परतल्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यात येण्याची सूचना करण्यात आली होती. त्यानुसार गुरुवारी ते वसंत विहार पोलीस ठाण्यात दाखल झाले.
शशी थरूर यांचे चार तास जबाब
सुनंदा पुष्कर १७ जानेवारी २०१४ रोजी दिल्लीतील एका पंचताराकिंत हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळल्या होत्या. दिल्ली पोलीसांनी सुमारे वर्षभरानंतर याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
सुनंदा थरूर मृत्यूप्रकरणी अमरसिंह यांचे जबाब
सुनंदा पुष्कर यांच्या मुलाकडूनही दिल्ली पोलीसांनी घेतला जबाब
सुनंदा पुष्कर यांच्या हत्येप्रकरणी गुरुवारी त्यांचा मुलगा शिवमेनन यांचा जबाब दिल्ली पोलीसांच्या विशेष तपास पथकाने नोंदवून घेतला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 05-02-2015 at 04:32 IST
TOPICSसुनंदा पुष्कर
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunanda pushkars son joins probe in murder case