भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स अंतराळयान मोहीम आजही अपयशी ठरली आहे. अवकाशात झेपावणार त्याआधीच त्यांचं यानात तांत्रिक बिघाड झाल्याने मोहिमेच्या तीन मिनिटांआधी ही मोहिम रद्द करावी लागली आहे. या महिन्यातील ही दुसरी घटना आहे. दरम्यान, सुनिता विल्यम्स आणि त्यांचे बुच विल्मोर हे सुरक्षित आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बोईंग स्टारलाईनर प्रक्षेपणाच्या अवघ्या ३.५१ सेकंदापूर्वी बंद पडले. अवकाश यानात झेप घेण्यासाठी सुनिता विल्यम आणि बुच विल्मोर नवीन बोईंग स्टारलाईन या अंतराळ यानात बसले होते. शनिवारी रात्री १० वाजता अमेरिकेच्या फ्लोरिडा येथून अॅटलस व्ही रॅकेटचा वापर करून ते अंतराळयानातून गगनझेप घेणार होते. परंतु, प्रक्षेपणाच्या काही मिनिटे आधीच तांत्रिक बिघाड झाल्याने ही मोहिमही आता पुढे ढकलण्यात आली आहे.

७ मे रोजीही ही नियोजित मोहीम अपयशी ठरली होती. आता या मोहिमेच्या नव्या प्रक्षेपणासाठी जवळपास २४ तास लागतील. परंतु, नव्या मोहिमेची वेळ अद्याप जाहीर केलेली नाही. ग्राउंड लॉन्च सिक्वेन्सर आणि रॉकेटवर लक्ष ठेवणाऱ्या संगणकाद्वारे तांत्रिक त्रुटी आढळून आली. अंतराळवीर आता स्टारलाइनर कॅप्सूलमधून बाहेर पडतील आणि केनेडी स्पेस सेंटरमधील क्रू क्वार्टरमध्ये परत येतील.

स्टारलाइनर अंतराळयानावर सुनीता प्रशिक्षण घेत होत्या. यानाच्या विकासातील अडथळ्यांमुळे मोहीम प्रलंबित होती. जुलै २०२२मध्ये स्टारलाइनर या नव्या यानातून अंतराळवीर अवकाशात जाणार होते, मात्र करोनामुळे ही मोहीम पुढे ढकलण्यात आली होती. २००६ आणि २०१२ मध्ये त्यांनी अंतराळात प्रवास केला होता. या दोनही मोहिमांमध्ये एकूण ३२२ दिवस त्यांनी अंतराळात घालवले होते. हा विक्रम मानला जात आहे. त्यामुळे यावेळेस त्या तिसऱ्यांदा अंतराळात जाणार होत्या.

हेही वाचा >> सुनीता विल्यम्स यांची तिसरी अंतराळ मोहीम रद्द, ‘हे’ आहे कारण

सुनीता विल्यम्स यांचा परिचय

सुनीता विल्यम्स यांनी १९८७ मध्ये यूएस नेव्हल अकादमीतून पदवी घेतली. त्यानंतर त्यांची नासामध्ये अंतरळवीर म्हणून निवड झाली. त्यांचे वडील दीपक पांड्या या अहमदाबादमधून अमेरिकेत स्थायिक झाले होते. सुनीता विल्यम्स यांचा जन्म १९६५ मध्ये झाला. यूएस नेव्हल अकादमीतून पदवी घेतलेल्या सुनीता विल्यम्स यांनी लढाऊ विमानंही उडवली आहेत. त्यांनी ३० प्रकारच्या लढाऊ विमानांवर तीन हजार तासांपेक्षा अधिक उड्डाणांचा अनुभव आहे. सुनीत विल्यम्स यांनी मायकेल विल्यम्स यांच्याशी लग्न केलं. मायकेल हे टेक्सासमध्ये पोलीस अधिकारी होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunita williams 3rd mission to space called off minutes before lift off sgk
Show comments