नासामधील भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानकावरून (आयएसएस) व्हिडीओ संदेश जारी करत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी निमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांचा हा व्हिडीओ दाखवण्यात आला. या व्हिडीओत त्यांनी त्यांच्या वडिलांची आठवणही काढली. तसेच त्यांनी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरीस यांचे आभारही मानले. सुनीता विल्यम्स या दीर्घकाळापासून अंतराळात अडकल्या आहेत.

व्हिडीओ संदेशात नेमकं काय म्हणाल्या सुनीता विल्यम्स?

अंतराळ स्थानकावरून मी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देते. यंदा मला पृथ्वीपासून २६० मैल दूर अंतराळात दिवाळी साजरी करण्याची संधी मिळाली आहे. माझ्या वडिलांनी आम्हाला दिवाळी आणि इतर सण साजरे करण्यास तसेच आपली सांस्कृतिक मुल्ये जपण्यास शिकवलं. दिवाळी हा आनंदाचा क्षण आहे, असे त्या म्हणाल्या.

Delhi Drugs Racket
Delhi Drugs Racket : दिल्लीत ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश! तब्बल ९५ किलो ड्रग्ज जप्‍त, तिहार जेल वॉर्डनचाही समावेश
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
blind couple stays with son's body
Blind Couple: मुलाचा घरात दुर्दैवी मृत्यू; अंध आई-वडील उपाशीपोटी चार दिवस घरातच पडून, हृदय पिळवटून टाकणारी घटना
Former CM Devendra Fadnavis of the BJP and Sena leader Sanjay Raut Meet
Meeting of Devendra Fadnavis and Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या ‘फोटो ऑफ द डे’ ची इनसाईड स्टोरी काय?
India retail sector
Diwali 2024 : यंदा बाजारात ‘व्होकल फॉर लोकल’चा प्रभाव; चीनी वस्तूंच्या विक्रीत घट; चीनला १.२५ लाख कोटी रुपयांचा फटका बसण्याची शक्यता
Amit Shah, justin trudeau
Amit Shah Canada : “कॅनडातील फुटीरतावाद्यांविरोधातील हिंसेमागे अमित शाह”, ट्रुडो सरकारचे गंभीर आरोप
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: जागतिक महासत्तेच्या चाव्या पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताब्यात; अमेरिकेत मोठ्या विजयासह सत्तारूढ होणार!

हेही वाचा – Sunita Williams Stuck in ISS : अंतराळात अडकलेल्या सुनिता विल्यम्स यांचा परतीचा मार्ग दृष्टीपथात; ‘हे’ दोन अंतराळवीर करणार मदत!

जो बायडेन आणि कमला हॅरिस यांचे मानले आभार

पुढे बोलताना त्यांनी व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी केल्याबद्दल राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचे आभारही मानले. भारतीय समुदायाबरोबर दिवाळी साजरी केल्याबद्दल मी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचे आभारही मानते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हेही वाचा – सुनीता विल्यम्स अंतराळातून करणार मतदान; हे कसे शक्य होईल? जाणून घ्या

विल्यम्स, विल्मोर अजूनही अवकाशात का अडकलेत?

५ जून रोजी सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर बोईंग स्टारलायनरच्या चाचणी मोहिमेसाठी आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानकावर (आयएसएस) रवाना झाले होते. ही स्टारलायनरची पहिलीच मानवी मोहीम होती. ते आठ दिवसांत परत येण्याची अपेक्षा होती; परंतु त्यांच्या परतीच्या प्रवासापूर्वी अंतराळयानातील काही प्रमुख यंत्रणांमध्ये समस्या आढळून आल्या. प्रोपल्शन सिस्टीममध्ये म्हणजेच यानाला पुढे ढकलणार्‍या उपकरणात गळती झाली आणि त्यातील काही थ्रस्टर्स बंद पडले. या तांत्रिक बिघाडांमुळे स्टारलाइनर क्रूशिवाय पृथ्वीवर परतले. दरम्यान, दोघांनाही परत आणण्यासाठी नासाद्वारे प्रयत्न सुरु आहेत. ते फेब्रुवारी २०२५ मध्ये पृथ्वीवर परत येण्याची शक्यता आहे.