Sunita Williams Scientific Contributions and Space Gardening : नासामधील भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स व त्यांचे सहकारी बॅरी विल्मोर आठ दिवसांसाठी बोईंग स्टारलायनरच्या चाचणी मोहिमेसाठी अंतराळात गेले होते. परंतु, त्यांना अंतराळात जाऊन आता नऊ महिने उलटून गेले आहेत, अद्याप ते परत आलेले नहीत. यानात बिघाड झाल्यामुळे त्यांच्या परतीच्या मार्गात अडचणी निर्माण झाल्या आहेत. नऊ महिन्यांपासून अंतराळात अडकल्याने त्यांना चालणंही कठीण जात आहे. मात्र आता त्यांचा परतीचा मार्ग मोकळा झाला आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस ते दोघेही पृथ्वीतलावर उतरणार आहेत. अंतराळात अनेक अडचणींचा सामना करावा लागत असला तरी त्यांनी हिंमत हरलेली नाही. विल्यम्स व वल्मोर दोघेही सुखरूप जमिनीवर उतरतील असा विश्वास नासाने व्यक्त केला आहे. दरम्यान, अंतराळात वेळ घालवण्यासाठी सुनीता विलियम्स यांनी काही प्रयोग केले आहेत. ९०० तासंहून अधिक वेळ त्यांनी तिथे संशोधनाचं काम केलं आहे.

यासह, सुनीता विल्यम्स यांनी आतापर्यंत अंतराळात ६०० हून अधिक दिवस घालवले आहेत. तसेच तब्बल ६२ तास नऊ मिनिटे स्पेसवॉक केला आहे. कोणत्याही महिला अंतराळवीराचा हा मोठा विक्रम आहे.

९०० तासांहून अधिक काळ त्यांनी संशोधनाचं काम

या अंतराळ मोहिमेदरम्यान, सुनीता विलियम्स यांनी बोइंग स्टारलायनर चालवलं. हे यान त्यांनी त्यांच्या नासातील सहकाऱ्यांबरोबर मिळून बनवलं आहे. नासाने ४.२ अब्ज डॉलर्स इतक्या किंमतीत हे यान बनवलं आहे. त्यांनी अंतराळात हे यान स्वच्छ केलं, यानावरील कचरा पृथ्वीवर पाठवण्याची व्यवस्था केली. १५० हून अधिक प्रयोगांमध्ये त्या सहभागी झाल्या होत्या. तसेच, ९०० तासांहून अधिक काळ त्यांनी संशोधनाचं काम केलं आहे.

अंतराळात रोपे लावली

परतीच्या प्रवासावेळी त्या स्पेसएक्सच्या क्रू ड्रॅगन या यानाचं उड्डाण करतील. यासह चार वेगवेगळी अंतराळयान चालवण्याचा त्या विक्रम करतील. यासह त्यांनी अंतराळात काही रोपे लावली आहेत. त्या वेळ काढून या रोपांची निगा राखतात. अंतराळात रोपांची वाढ कशी होते यावरही त्या संशोधनही करत आहेत. याद्वारे भविष्यात अंतराळात अन्नधान्य पिकवण्याच्या शक्यतांचा अभ्यास केला जात आहे.