Sunita Williams Stuck in ISS : नासामधील भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानकावर (आयएसएस) अडकले आहेत. त्यांच्या यानात बिघाड झाल्याने दोघांचाही परतीचा प्रवास लांबला आहे. परंतु, त्यांना पृथ्वीवर आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या परतीच्या प्रवासात तिच्याबरोबर दोन प्रतिष्ठित अंतराळवीर आहेत. निक हेग आणि अलेक्झांडर गोर्बुनोव्ह. हे दोघेही २६ सप्टेंबर रोजी प्रक्षेपित होणाऱ्या स्पेस एक्स क्रू ९ मोहिमेचा भाग आहेत. अंतराळयानात तांत्रिक समस्या निर्माण झाल्याने सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांच्या सुरक्षित परतीच्या प्रवासासाठी ही मोहिम आखण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निक हेग

निक हेग यांना अमेरिकेतली स्पेस फोर्समध्ये सक्रिय कर्नल स्पेस एक्स क्रू ९ मोहिमेचा अनुभव आहे. कॅन्सन येथील बेलेविले येथे जन्मलेले हेग यांनी अंतराळ इंजिनिअरिंग केलं आहे. २०१३ मध्ये नासामध्ये सामील होण्यापूर्वी त्यांनी युएस एअर फोर्समध्ये विविध पदांवर काम केलंय. हेग यांची आयएसएची ही दुसरी आणि एकूण तिसरे अंतराळ उड्डाण असेल. यापूर्वीच्या मोहिमांमध्ये म्हणजेच २०१८ मध्ये सोयुझच्या प्रक्षेपण दरम्यान एक नाट्यमयपणे उड्डाणादरम्यान त्यांनी आयएसएस वर सहा महिन्यांचा यशस्वी मुक्काम केला आहे. आयएसएसवर असताना त्यांनी तीन स्पेसवॉक केले आहेत. तसंत स्टेशनच्या यंत्रणांची देखभाल आणि सुधारणा करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. हेग या मोहिमेचे नेतृत्व करणार आहे.

हेही वाचा >> सुनीता विल्यम्स अंतराळातून करणार मतदान; हे कसे शक्य होईल? जाणून घ्या

अलेक्झांडर गोर्बुनोव्ह

रोस्कोमोसमध्ये कॉम्सोनट असलेले अलेक्झांडर गोर्बुनोव्ह हेसुद्धा स्पेस एक्स क्रू ९ मोहिमेत समाविष्ट आहेत. मूळचे रशियाचे असलेले गोर्बुनोव्ह यांनी अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलं असून स्पेसक्राफ्ट आणि अप्पर स्टेजेसमध्ये प्राविण्य मिळवलं आहे. २०१८ मध्ये कॉस्मोनट म्हणून नियुक्त होण्याआधी ते रॉकेट स्पेस कॉर्प. एनिर्जिया येथे अभियांत्रिक होते. अलेक्झांडर यांची ही पहिलीच स्पेसफ्लाइट असली तरीही अभियांत्रिकीतील प्राविण्य आणि प्रशिक्षणामुळे ते ही मोहिम यशस्वी करण्यास सज्ज आहेत. आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमध्ये त्यांची नियुक्ती मिशन तज्ज्ञ म्हणून करण्यात आली असून तांत्रिक ऑपरेशन्समध्ये ते मदत करणार आहेत. मोहिमेचे यश आणि क्रू सुरक्षितपणे परत येण्यासाठी गोर्बुनोव्हचे योगदान महत्त्वाचे ठरेल.

विल्यम्स, विल्मोर अजूनही अवकाशात का अडकलेत?

५ जून रोजी सुनीता विल्यम्स आणि विल्मोर बोईंग स्टारलायनरच्या चाचणी मोहिमेसाठी आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानकावर (आयएसएस) रवाना झाले. ही स्टारलायनरची पहिलीच मानवी मोहीम होती. ते आठ दिवसांत परत येण्याची अपेक्षा होती; परंतु त्यांच्या परतीच्या प्रवासापूर्वी अंतराळयानातील काही प्रमुख यंत्रणांमध्ये समस्या आढळून आल्या. प्रोपल्शन सिस्टीममध्ये म्हणजेच यानाला पुढे ढकलणार्‍या उपकरणात गळती झाली आणि त्यातील काही थ्रस्टर्स बंद पडले. स्टारलायनर झेपावले तेव्हाच या उपकरणात त्रुटी होत्या; मात्र असे असूनही यान सुरक्षितपणे अंतराळस्थानकावर पोहोचले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunita williams stranded in space finds her way back this two astronauts will help sgk