Sunita Williams may Return in 2025 : नासामधील भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स व त्यांचे सहकारी बॅरी विल्मोर गेल्या दोन महिन्यांपासून अंतराळात अडकले आहेत. नासासह अमेरिका आणि भारत त्या दोघांच्या पृथ्वीवर येण्याची वाट पाहत आहेत. त्यांना परत आणण्यासाठी नासाकडून सर्व प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र अद्याप नासाला यामध्ये यश आलेलं नाही. दरम्यान, एक वाईट बातमी समोर आली आहे. दोन्ही अंतराळवीरांना अजून काही महिने अंतराळातच राहावं लागू शकतं. सुनीता विल्यम्स व बॅरी विल्मोर सध्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात आहेत. बोइंग कंपनीचं ‘स्टारलायनर’ हे अंतराळयान ५ जून रोजी दोन्ही अंतराळवीरांना घेऊन अवकाशात झेपावलं होतं. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून एक किंवा दोन आठवड्यांत ते परततील अशी अपेक्षा नासाने व्यक्त केली होती. मात्र, आता दोन महिने उलटले तरी अद्याप ‘स्टारलायनर’ पृथ्वीवर परतलं नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा