पीटीआय, नवी दिल्ली

पुरेशी प्रथिने आणि अनेक जीवनसत्त्वांचा (मल्टिव्हिटॅमिन) समावेश असलेल्या मासिक आहार योजनेमुळे भारतातील क्षयरुग्णांच्या (टीबी) कुटुंबसदस्यांना क्षयरोगाचा संसर्ग होण्याचे प्रमाण निम्म्याने कमी होते. त्यामुळे नवे रुग्ण निर्माण होत नाहीत. परिणामी क्षयरोगामुळे होणाऱ्या मृत्युदरातही घट होते, असा निष्कर्ष ‘द लॅन्सेट’ या जागतिक आरोग्य विज्ञानपत्रिकेत (ग्लोबल हेल्थ जर्नल) प्रकाशित झालेल्या संशोधनाद्वारे मांडण्यात आला आहे.

Hundreds of poor patients are receiving free dialysis services at health department hospitals
दुर्गम भागातील रुग्णांसाठी आरोग्य विभागाची ‘टेलीमेडिसिन’ सेवा ठरतेय संजीवनी! सव्वा लाख रुग्णांना झाला फायदा…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
सोनु सुदने चपाती खाणे केले बंद! चपाती खाणे पूर्णपणे बंद केल्यास तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल?
Health benefits associated with boiled food
Gurmeet Choudhary: दीड वर्ष साखर, चपाती, भात अन् भाकरी खाल्लीच नाही तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? वाचा तज्ज्ञांचे मत…
Makar sankranti 2025 special bhogi bhaji recipe in marathi and health benefits everyone should know
“भोगीची भाजी” एकदम चमचमीत आणि पारंपारिक रेसिपी; ही घ्या सोपी मराठी रेसिपी
health benefits of Tilache Laddoos
हिवाळ्यात भरपूर प्रमाणात तिळाचे लाडू का खावेत? वजन कमी करण्यापासून ते रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यापर्यंत तज्ज्ञांनी सांगितले फायदे
chaturang article
स्थलांतरातून बहरलेली खाद्यसंस्कृती
जेवणापूर्वी व्हिनेगर का पितात जपानी लोक? तज्ज्ञांनी केला खुलासा….

संशोधकांच्या एका आंतरराष्ट्रीय पथकाने झारखंडमधील चार जिल्ह्यांत हा अभ्यास केला. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमात फुप्फुसाच्या क्षयरोगाच्या दोन हजार ८०० रुग्णांच्या कुटुंबीयांचा समावेश करण्यात आला. रुग्णांना सहा महिन्यांसाठी मासिक दहा किलोग्रॅम शिधा (तांदूळ, डाळी, दूध पावडर, तेल) आणि पूरक जीवनसत्त्वे (मल्टिव्हिटॅमिन) देण्यात आली. तर कुटुंबातील सदस्यांना दरमहा पाच किलो तांदूळ आणि दीड किलो डाळ असा शिधा दिला.

नवीन आहारपद्धती सुरू झाल्यानंतर क्षयरुग्णांच्या कुटुंबीयांची तपासणी करण्यात आली. रुग्णसंपर्कामुळे त्यांना क्षयरोगाचा संसर्ग होतो का, याच्या अभ्यासासाठी सर्व सहभागींचा ३१ जुलै २०२२ पर्यंत सक्रिय पाठपुरावा करण्यात आला. ऑगस्ट २०१९ ते जानेवारी २०२१ दरम्यान, दहा हजार ३४५ क्षयरुग्ण संपर्कातील कुटुंबीयांचे दोन गटांमध्ये विभागून निरीक्षण करण्यात आले. या अभ्यासातील जवळपास दोन तृतीयांश लोक संथाल, हो, ओरांव आणि भूमिज यांसारख्या स्थानिक समुदायातील होते आणि जवळपास ३४ टक्के (१०,३४५ पैकी ३,५४३) कुपोषणग्रस्त होते.

पोषक आहाराचा सकारात्मक परिणाम

अभ्यासातून असे आढळले की पोषक आहार मिळाल्यानंतर फुप्फुसाचा क्षय झालेल्या रुग्णांची संख्या ४० टक्के कमी झाली तर संसर्गजन्य क्षयरुग्णांची संख्या ५० टक्क्यांनी घटली. जवळपास निम्म्या रुग्णांचे बॉडी-मास-इंडेक्स (बीएमआय) १६ पेक्षा कमी होते आणि मृत्युदर ३५ ते ५० टक्के होता. पौष्टिक आहारामुळे पहिल्या दोन महिन्यांत त्यांचे वजन वाढले आणि मृत्यूचे प्रमाण ६० टक्क्यांनी घटले.

क्षयबाधितांचा जीव वाचवणे आणि प्रकृती सुधारण्यासाठी क्षयरोगांवरील उपचारांत आहार महत्त्वाची भूमिका बजावतो. कुपोषित रुग्णांमध्ये क्षयाचा उच्च प्रसार आणि तीव्रता यामुळे मृत्यूचा धोका वाढतो, त्यामुळे भारताच्या संदर्भात रुग्णसेवेमध्ये पोषक आहार हा आवश्यक भाग असला पाहिजे. – अनुराग भार्गव, संशोधक

Story img Loader