केरळच मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी शुक्रवारी करोनासंदर्भातील नवीन नियमांची घोषणा केलीय. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर काही नियमांमध्ये सूट देण्यात आली आहे. यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशननं केरळ सरकारविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली. या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी झाली असून कोर्टानं केरळ सरकारकडून उत्तर मागितलं आहे. आता या प्रकरणावर उद्या (मंगळवार) सुनावणी होणार आहे. सध्या या निर्णयावर कोणतंही मत सुप्रीम कोर्टानं नोंदवलेलं नाही. दुसरीकडे उत्तर प्रदेश सरकारनं कावड यात्रा रद्द केल्यानं त्या संदर्भातील याचिका बंद करण्यात आली आहे.
‘बकरी ईद’च्या कालावधीमध्ये करोनाची परिस्थिती लक्षात घेत राज्य सरकारने नियमांमध्ये सूट दिल्यास परिस्थिती आणखीन गंभीर होऊ शकते असं आयएमएचं म्हणणं आहे. देशातील सर्वोच्च वैद्यकीय संस्था असणाऱ्या आयएमएनं केरळमध्ये करोनाचा प्रादुर्भाव अधिक असतानाही सरकारने दिलेली निर्बंधांमधील सूट चिंताजनक असल्याचं मत व्यक्त केलं आहे. ही सूट दिल्याने राज्यात करोनाचं संकट अधिक गडद होण्याची चिन्ह असल्याचे संकेत एमआयएनं दिले आहेत.
Supreme Court seeks Kerala government’s response on plea against its decision easing restrictions ahead of Eid-ul-Azha (Bakrid) when the state is witnessing a surge in COVID-19 cases and test positivity rate.
Supreme Court to hear the case tomorrow
— ANI (@ANI) July 19, 2021
बकरी ईदनिमित्त जास्तीत जास्त ४० जणांना एका जागी जमण्यास परवानगी देण्यात आलीय. मात्र या ४० जणांनी लसीचा किमान एक डोस घेणं बंधनकारक आहे. केरळ सरकारने तीन दिवसांची सूट वगळता विकेण्ड लॉकडाउन सुरु ठेवण्याचा निर्णय घेतलाय. २० तारखेला बकरी ईद आहे. या नवीन नियमांमुळे वाद निर्माण झाला असून अनेकांनी यासंदर्भात नाराजी व्यक्त केली आहे.
Pegasus Snoopgate: “ते काय वाचतात आम्हाला माहिती आहे”, हेरगिरीवरून राहुल गांधींचा सरकारवर निशाणा
गेल्या २४ तासात देशात ३८ हजार १६४ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे आता देशातल्या उपचाराधीन रुग्णांची संख्या ४ लाख २१ हजार ६६५ वर पोहोचली आहे. देशात काल दिवसभरात ३८ हजार ६६० रुग्ण करोनामुक्त झाले. त्यामुळे देशातल्या करोनामुक्तांची संख्या आता तीन कोटी तीन लाख ८ हजार ४५६ झाली आहे. तर देशाचा रुग्ण बरे होण्याचा दर आता ९७.३२ टक्क्यांवर स्थिरावला आहे.