पीटीआय, नवी दिल्ली
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
हिट अँड रन अपघातांमध्ये मृत्यू आणि गंभीर दुखापत झाल्यास देण्यात येणाऱ्या नुकसानभरपाईची रक्कम वाढविण्याबाबत विचार करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले. न्यायालयाने सरकारला आठ आठवडय़ांच्या आत याबाबत योग्य निर्णय घेण्यास सांगितले असून २२ एप्रिल रोजी पुढील सुनावणी ठेवली आहे.
मोटार वाहन कायदा १९८८ नुसार हिट अँड रन अपघातांमध्ये कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झाल्यास कमाल दोन लाख रुपये किंवा सरकारने विहित केलेली अधिक रक्कम भरपाई म्हणून दिली जाते. गंभीर जखमी झाल्यास ५० हजार रुपये दिले जातात. सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांना अशा अपघातातील पीडितांच्या कुटुंबीयांना मोटार वाहन कायद्यांतर्गत नुकसानभरपाई योजना आणि त्याची आकडेवारी यांची माहिती देण्यास सांगितले. न्यायमूर्ती ए. एस. ओका आणि न्यायमूर्ती पंकज मित्तल यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले आहेत.
हेही वाचा >>>Bharat Jodo Nyay Yatra : राहुल गांधींची ‘चाय पे चर्चा’, मणिपूरमध्ये साधला स्थानिकांशी संवाद
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने प्रकाशित केलेल्या वर्षनिहाय अहवालानुसार, २०१६ मध्ये ५५,९४२ हिट अँड रन अपघातांची नोंद झाली होती, तर २०२२ मध्ये हा आकडा ६७,३८७ होता. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्र्यांनी गेल्या वर्षी मार्चमध्ये लोकसभेत दिलेल्या उत्तराचीही खंडपीठाने दखल घेतली.
आकडेवारी काय सांगते?
गेल्या पाच वर्षांत, हिट अँड-रन प्रकरणांमध्ये ६६० मृत्यू आणि ११३ जण जखमी झाले. ज्यांना एक कोटी ८४ लाख रुपये भरपाई देण्यात आली आहे.