Supreme Court on Bulldozer Action: सर्वोच्च न्यायालयाने आज बुलडोझर कारवाईसंदर्भातील सुनावणीमध्ये महत्त्वपूर्ण अंतरिम आदेश दिले. पुढील सुनावणी होईपर्यंत न्यायालयाच्या परवानगीशिवाय देशभरात कुठेही बुलडोझर कारवाई केली जाऊ नये, असं न्यायालयाने नमूद केलं आहे. सार्वजनिक मालमत्तांवरील अतिक्रमणांना या आदेशांमधून वगळण्यात आलं असलं, तरी एकही बेकायदेशीर पाडकाम घटनेच्या मूलभूत तत्वांच्या विरोधात असल्याचं परखड मत न्यायालयाने यावेळी नोंदवलं. या अंतरिम आदेशांनंतर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सत्ताधारी भाजपावर अप्रत्यक्षपणे हल्लाबोल केला आहे.

काय म्हटलंय अखिलेश यादव यांनी?

अखिलेश यादव यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर या आदेशांबाबत प्रतिक्रिया देणारी पोस्ट शेअर केली आहे. “न्यायाच्या सर्वोच्च आदेशामुळे बुलडोझरच नाही, तर त्याचा दुरुपयोग करणाऱ्यांच्या विध्वंसक राजकारणालाही बाजूला सारलं आहे. आज बुलडोझरची चाकं मोकळी झाली आहेत आणि स्टेअरिंग निघालं आहे”, असं अखिलेश यादव यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

terror of gangster Mangalwar Peth , Mangalwar Peth,
पुणे : तडीपार गुंडाची कोयते उगारून दहशत, मंगळवार पेठेतील घटना
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
kalyan Dombivli municipal corporation
डोंबिवलीतील कोपरमध्ये स्थगिती आदेश देऊनही बेकायदा बांधकामाची उभारणी सुरूच; शासन, कडोंमपाचे आदेश बांधकामधारकांकडून दुर्लक्षित
vehicle dragging police
संतापजनक! दोन वाहतूक पोलिसांना कारच्या बोनेटवरून फरफटत नेलं; दिल्लीतील घटना
without helmet officers and employees should be banned from pimpri chinchwad municipal corporation
पिंपरी : हेल्मेट नसल्यास अधिकारी, कर्मचाऱ्यांना महापालिकेत मज्जाव
What Sada Sarvankar Said?
Sada Sarvankar : “मी माघार घेण्याचा काही प्रश्नच नाही, माहीमधून लढणार आणि…”; सदा सरवणकर यांचं वक्तव्य
Palghar MLA Shrinivas Vanga return
Shrinivas Vanga: ‘आधी रडले, ठाकरेंना देव म्हणाले’, घरी परतल्यावर आमदार श्रीनिवास वनगांचे सूर बदलले; म्हणाले, “एकनाथ शिंदे…”
3 labourers killed in container tractor collision
बुलढाणा : भरधाव कंटेनरची ट्रॅक्टरला धडक; तीन मजूर ठार

“आता ज्यांनी बुलडोझरलाच आपली ओळख बनवलं होतं, त्यांच्यासाठी हा त्यांची ओळख पुन्हा स्थापित करण्याचाच मुद्दा बनला आहे. आता ना बुलडोझर चालू शकणार, ना त्याला चालवणारे चालू शकणार. दोन्ही गोष्टी पार्किंगमध्ये उभ्या करण्याची वेळ आली आहे. आज बुलडोझरची विचारसरणी उद्ध्वस्त झाली आहे. आता काय बुलडोझरचंही नाव बदलून त्याचा दुरुपयोग करणार का? खरंतर हा जनतेचा प्रश्न नसून एक मोठी शंका आहे”, अशी खोचक पोस्ट अखिलेश यादव यांनी केली आहे.

Supreme Court on Bulldozer Action: “दोन आठवड्यांत काय आकाश कोसळणार आहे का?” सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सुनावलं; बुलडोझर कारवाईबाबत अंतरिम आदेश!

काय म्हटलं आज सर्वोच्च न्यायालयाने?

गुन्ह्यांमध्ये आरोपी असणाऱ्या व्यक्तींच्या मालमत्तांवर शिक्षा म्हणून बुलडोझरच्या सहाय्याने पाडकाम केलं जात असल्याचा आरोप करणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत. त्यावरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने आज अंतरिम आदेश दिले. १ ऑक्टोबर रोजी या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार असून तोपर्यंत न्यायालयाच्या परवानगीशिवाय देशभरात कुठेही बुलडोझरने पाडकाम केलं जाऊ नये, असे निर्देश न्यायालयाने आज दिले आहेत. मात्र, यातून सार्वजनिक जागेवर अतिक्रमण केलेल्या मालमत्तांना वगळण्यात आलं आहे.

न्यायालयाने केंद्र सरकारला सुनावलं

दरम्यान, या आदेशावर हरकत घेत सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी देशभरातील प्रशासनाला अशा प्रकारे पाडकाम न करण्याचे आदेश देता येणार नाहीत, असा मुद्दा उपस्थित केला. त्यावर न्यायालयाने त्यांना सुनावलं. “आम्ही सार्वजनिक जागांवरील अतिक्रमणांना यातून वगळलं आहे. १ ऑक्टोबरपर्यंत हे आदेश लागू असतील. दोन आठवड्यांत काही आकाश कोसळणार नाहीये. पुढील सुनावणीपर्यंत प्रशासनाचे हात शांत ठेवा”, असं यावेळी न्यायालयाने केंद्र सरकारला बजावलं.